A twelfth year old boy was killed in a collision with an unknown vehicle 
नागपूर

काही दिवसांसाठी आत्याकडे राहायला आला मुलगा; फोन आल्यानंतर वडिलांनी फोडला हंबरडा

मनोहर घोळसे

सावनेर (जि. नागपूर) : स्थानिक गडकरी चौकातून स्कुटीने डब्लूसीएलकडे जाताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने स्कुटीला समोरासमोर जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्कुटीचालक जखमी झाला. तर मागे बसलेला बारा वर्षीय मुलगा जागीच ठार झाल्याची घटना सावनेर शहरात घडली. भूषण सुरेश कुमरे (वय १२, रा. खापा) असे मृत बालकाचे नाव आहे. शंकर रमेश जाधव (वय १४, रा. बजाज कॉलनी, डब्ल्यूसीएल सावनेर) असे जखमीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास स्थानिक गडकरी चौकातून एमएच ४० बीएस ०३९२ क्रमांकाच्या दुचाकीने भूषण व शंकर हे जात होते. डब्ल्यूसीएलकडे जात असताना कोलार नदीच्या पुलावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनचालकाने वाहन वेगाने व निष्काळजीपणाने चालवून दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेत भूषण व शंकर दोघेही पडले. अज्ञात वाहन चालकाने भूषणच्या अंगावर गाडी चढवल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी भूषणला मृत घोषित केले. यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. तसेच जखमी शंकरला उपचारासाठी नागपूरला ‘रेफर’ करण्यात आले.

मृताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सावनेर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, अज्ञात वाहनचालकाचा शोध घेतला जात आहे. मृत बालकाचे आई-वडील मजुरी करतात. भूषण हा खापा येथे पाचव्या वर्गात शिक्षण घेत होता. तो सावनेर येथील डब्लूसीएलमध्ये राहणाऱ्या आत्याकडे आला होता. चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वडिलांनी तर या घटनेमुळे हंबरडाच फोडला होता.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शेतकऱ्यांच्या DBT वर दसऱ्यापर्यंत मदत जमा करणार'; अजित पवार यांचे आश्‍वासन, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचीही दिली ग्वाही

Pune Traffic App : वाहनचालकांवर मोबाईलवरूनच कारवाई, ‘पुणे ट्रॅफिक’ ॲपला प्रतिसाद; आतापर्यंत ४२ हजार तक्रारी

Shivram Bhoje Death : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगाव येथे आज होणार अंत्यसंस्कार

Latest Marathi News Updates : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगावात आज अंत्यसंस्कार

Mumbai Monorail : मुंबईकरांसाठी मोठी बातमी ! मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद , MMRDA ने का घेतला निर्णय ?

SCROLL FOR NEXT