drowning  
नागपूर

होळीच्या दिवशी रंग खेळण्याचा आनंद बेतला जिवावर; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू  

सकाळ डिजिटल टीम

बाजारगाव, मौदा (जि. नागपूर): धुळवडीच्या दिवशी जिल्ह्यातील कोंढाळीनजीकच्या बाजारगाव आणि मौदा येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन बालकांचा तलावात बुडून मृत्यू झाला.

बाजारगाव येथील प्रतीक तेजराम सोनटक्के (वय १५, रा. बाजारगाव) असे मृत बालकाचे नाव असून सोमवारी (ता.२९) सकाळी अकराच्या सुमारास रंग खेळत होता. त्यानंतर मित्रासोबत तलावावर पोहण्यासाठी गेला आणि परत आलाच नाही. रात्री उशिरापर्यंत प्रतीक घरी न आल्याने घरच्या सदस्यांनी त्याचा शोध घेणे सुरु केले. खूप शोधल्यानंतर जेव्हा प्रतीकचा पता लागला नाही, तेव्हा कोंढाळी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बाजारगाव चौकीत प्रतीकचा भाऊ जय तेजराम सोनटक्के याने तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी शोध घेणे सुरु केले असता काही नागरिकांकडून प्रतीक काल तलावाकडे जात असल्याची माहिती मिळाली. तलावाची पाहणी केली असता मंगळवारी (ता.३०) सकाळी अकराच्या सुमारास तलावात मृतदेह आढळला. प्रतीकच्या कुटुंबासह संपूर्ण बाजारगाव परिसरात शोककळा पसरली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोद केली असून पुढील तपास कोंढाळीचे ठाणेदार विश्वास पुल्लरवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सोनवले करीत आहेत.

मौदा येथील प्रतीक किशोर धनजोडे (वय१७) सोमवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान कन्हान नदीत बुडून मृत्यू झाला.

सोमवारी जनता विद्यालयात शिकत असलेला प्रतीक व त्याचे मित्र रंग खेळले. दुपारी १ वाजताच्या दरम्यान प्रतीक व सात मित्र मौद्यावरून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या माथनी येथील कन्हान नदीच्या पात्रात गेले. नदीत मच्छीमारांची नौका होती. सर्व मित्र नावेत बसले. नदीच्या पात्रात गेल्यानंतर ‘सेल्फी’ काढण्याच्या बेतात प्रतीकचा तोल गेला व नाव पलटली. सर्व मुले पाण्यात पडले.

लगेच उपस्थित मासेमारांनी त्यांना बाहेर काढले. परंतु प्रतीक व मयूर चाचेरे माथनी यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे यांना नागपूर येथील खासगी रुग्णालयात नेले. परंतु प्रतीकला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मयूर याच्यावर उपचार सुरू आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT