two crore fraud with traders in nagpur crime news 
नागपूर

परकीय चलनासह पर्यटनाच्या क्षेत्रात गुंतवणूक पडली महाग, दोन व्यापाऱ्यांना दोन कोटींचा गंडा

अनिल कांबळे

नागपूर : परकीय चलनाची देवाण-घेवाण व विदेशी पर्यटनाच्या क्षेत्रात व्यावसायिक गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील दोन व्यापाऱ्यांची पावणे दोन कोटींनी फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे. यात शहरातील गोयल कुटुंबातील सहा जणांसह एकूण सात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

देवेंद्र गोविंद गोयल, रितेश गोविंद गोयल, गोविंद मुरारीलाल गोयल, निकीता देवेंद्र गोयल, अनिता गोविंद गोयल, जितेंद्र मुरारीलाल गोयल सर्व रा. गोविंद भवन, रामदासपेठ आणि पायल सोमानी रा. भक्तीसागर को ऑपरेटिव्ह सोसायटी, आंबेडकर चौक अशी आरोपींची नावे सांगण्यात येतात. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार आरोपींचा श्री हॉलिडेज नावाने ट्रॅव्हलींग हॉलिडेज बुकिंग, इंटरनॅशनल ट्रॅव्हल्स, परकीय चलन बदलून देण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून देण्याचे आमिष त्यांनी संपर्कातील व्यापाऱ्यांना सांगितले होते. वाडीच्या लिली लाइफ स्टाइल सोसायटीतील रहिवासी सुरेशचंद्र अग्रवाल (७३) यांनी गुंतवणुकीची तयारी दाखविली. विश्वास बसावा यासाठी आरोपींनी आरबीआयचे बनावट लायसन्स दाखविले. ऑगस्ट २०१६ पासून दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या. अग्रवाल यांनी गोयल यांच्याकडे ५९ लाख रुपये गुंतवले. पण, कोणताही परतावा न देता फसवणूक केली. 

मस्कासाथ, इतवारी येथील रहिवासी आशिष जैन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, देवेंद्र गोयल, रितेश गोयल, गोविंद गोयल, निकिता गोयल यांनी संपर्क साधून व्यावसायिक गुंतवणुकीसाठी भाग पाडले. डिसेंबर २०१४ ते फेब्रुवारी २०१८ दरम्यान बँकेमार्फत व रोख स्वरूपात एकूण २ कोटी २९ लाख ९० हजार रुपये घेतले. व्यवसायात नफा झाल्याचे सांगून १ कोटी १६ लाख ८१ हजार ५०० रुपये परतही दिले. उर्वरित १ कोटी १३ लाख ८ हजार ५०० रुपये अद्यापही दिले नाहीत. प्रत्यक्ष व फोनवरून मागणी करूनही पैशांची परतफेड केली नाही. दोन्ही प्रकरणांमध्ये अंबाझरी व तहसील पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवीत पुढील तपास सुरू केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घाटकोपरमध्ये फूटपाथवर झोपलेल्यांना कारची धडक, २ तरुणींसह तिघेजण ताब्यात; कारचालक तरुण रिक्षाने झालेला फरार

Latest Marathi News Updates : धनगरांना ST आरक्षण न दिल्यास वर्षा बंगल्यावर मेंढरं सोडू

Gadchiroli News: एक वर्षापासून लपवला नगरसेविकेचा राजीनामा; कोरचीच्या नगराध्यक्षांचा प्रताप, पद वाचवण्यासाठी लढवली वेगळीच शक्कल

Kolhapur Airport Emergency : कोल्हापूर विमानतळावर ‘इमर्जन्सी लँडिंग’, काय होती मेडिकल इमर्जन्सी; पुढे काय झाल?

Crime News : गोव्यात उपचाराच्या नावाखाली परदेशी तरुणीवर अत्याचार, २८ वर्षीय डॉक्टरला सोलापुरातून अटक, ICU मध्ये असताना त्याने...

SCROLL FOR NEXT