Nagpur Rain Update  Sakal
नागपूर

Nagpur Rain Update : वीज पडून दोन भाविकांचा मृत्यू; काटोल तालुक्यातील आलागोंदी येथील घटना

काटोल तालुक्यातील आलागोंदी गावाला लागून गोविंदराव पंचभाई यांच्या शेतात रविवारी उदापूर (ता.वरुड) आलागोंदी येथील वाघोबा देवस्थानात धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सकाळ वृत्तसेवा

काटोल\कोंढाळी : काटोल तालुक्यातील कोंढाळी पोलिस ठाण्यांतर्गत आलागोंदी येथे रविवारी दुपारी अडचच्या सुमारास पावसापासून बचावासाठी शेतातील झाडाखाली उभ्या असलेल्या दोन पाहुण्यांवर वीज कोसळून जागेवरच त्यांचा मृत्यू झाला.जयदेवराव नबू मनोठे (६०, मंगोना, ता.मुलताई, जि. बैतूल) व भागवतराव दौलत भोंडवे (५५, उदखेड, ता. मोर्शी, जि. अमरावती) अशी मृतांची नावे आहेत.

काटोल तालुक्यातील आलागोंदी गावाला लागून गोविंदराव पंचभाई यांच्या शेतात रविवारी उदापूर (ता.वरुड) आलागोंदी येथील वाघोबा देवस्थानात धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी विविध ठिकाणांहून सुमारे ५० भाविक आले होते. दुपारी वातावरणात अचानक बदल झाला व वादळी वारा, ढगांचा गडगडाट होऊन मुसळधार पावसासह गारपीट सुरू झाली.

त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. बचावासाठी जयदेवराव नबू मनोठे व भागवतराव दौलत भोंडवे हे दोघे शेतातील पळसाच्या झाडाखाली उभे असताना झाडावर वीज पडून दोघांचाही जागीच मृत्यू झाला. एपीआय धवल देशमुख यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह काटोलच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

शहरात ढगाळ वातावरण

शहरात दिवसभर उन्ह आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरु होता. कमाल तापमानात घट झाली. शहरात आज ३८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला. तर, काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे पडझडीच्या घटना घडल्यात. हवामान विभागाने विदर्भात आणखी तीन दिवस वादळी पावसाचा इशारा दिलेला आहे. ‘विंडी डॉट कॉम’ या संकेतस्थळानेही तशी शक्यता व्यक्त केली आहे. ‘सायक्लॉनिक सर्क्युलेशन’ मुळे सध्या नागपूरसह संपूर्ण विदर्भात पाऊस व ढगाळ वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT