पा्ण्यात बुडून मृत्यू ई सकाळ
नागपूर

बापासाठी अखेरचा ठरला मुलाचा वाढदिवस, तलावात बुडून बाप अन् लेकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : हिंगण्यातील झिल्पी तलावावर (zilpi dam) वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा गाळात फसून मृत्यू झाला. ही घटना आज १ वाजण्याच्या सुमारास घडली असून पत्नीला तलावातून बाहेर काढण्यात यश आले. अब्दुल आसिफ अब्दुल गणी शेख (३५), मृतक मुलगा अब्दुल चहबील अब्दुल आसीफ (१२), असे मृतांची नावे असून पत्नी आसमा अब्दुल आसिफ अब्दुल गणी शेख सुखरूप बचावले. (two died by drowning in zilpi dam in hingana of nagpur)

शहरातील यशोधरानगरमधील टिपू सुलतान चौकातील रहिवासी कुटुंब दुचाकीने आज सोमवारी दुपारी 'साडेअकरा वाजताच्या दरम्यान वाढदिवस साजरा करण्यासाठी हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी तलावावर दुचाकीने आले. पती पत्नी व दोन मुले सोबत होती. त्यातील लहान मुलगा आसिफचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा केल्यानंतर बाप-लेक मोहगाव तलावातील पाण्यात उतरले. पाण्यातील गाळात फसल्याने ते पाण्यात बुडाले, हे चित्र पाहून पत्नीही तलावात उतरली. तलावावर उपस्थित असलेल्या काही जणांना हे दृश्य दिसले. यामुळे पत्नीला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. ‌ मात्र, दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या वडिलांचे वय ३२ असून मुलाचे वय १२ आहे. हिंगणा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले असून हा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT