Nagpur Crime News sakal
नागपूर

Nagpur Crime News : मुंबईत फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने दोन डॉक्टरांची फसवणूक

मुंबईत एका बहुमजली इमारतीमध्ये फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने नागपुरातीन दोन डॉक्टरांची रिॲलिटी कंपनीच्या संचालकांनी चार कोंटींनी फसवणूक केली.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मुंबईत एका बहुमजली इमारतीमध्ये फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने नागपुरातीन दोन डॉक्टरांची रिॲलिटी कंपनीच्या संचालकांनी चार कोंटींनी फसवणूक केली. याप्रकरणी वाडी पोलिस ठाण्यात डॉ. संतोष तिवारी (वय ४४ रा. गोकुळपेठ) यांच्या तक्रारीवरून ‘मात्रा रिॲलिटी ॲण्ड डेव्हलपर प्रा. लि. कंपनी’च्या पाच संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अरुण खन्ना, दर्शन मेहता, , रमन खन्ना, आर्यमन खन्ना, होजेफा अमरेलीवाला, अशी आरोपींची नावे आहेत. डॉ. तिवारी हे व्हाइट क्लिफ डेव्हलपर्स प्रा. लि.चे संचालक आहेत. २०१६ मध्ये त्यांनी मुंबईतील सेनापती बापट मार्गावर असलेल्या १८ मजली इमारतीमध्ये दोन फ्लॅट खरेदीचा व्यवहार केला. धनादेशाद्वारे ही रक्कमही दिली.

वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा व्यवहार झाला. पैसे दिल्यानंतरही तिवारी यांना रजिस्ट्री करून दिली नाही. जुलै २०१८ मध्ये मात्राने तिवारी यांना दोन कोटी ५८ लाखांचा धनादेश दिला. पण तो वटला नाही. दुसरा धनादेश देण्याच्या बहाण्याने तिवारी यांच्याकडून पहिला धनादेश परत घेण्यात आला. त्यानंतरही त्यांना पैसे परत मिळाले नाही. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

SCROLL FOR NEXT