chandrpur coal center  sakal
नागपूर

कोळसा टंचाईने चंद्रपूरचे दोन संच बंद

राज्यातील वीज केंद्रे सहा महिन्यांच्या कालावधीत दुसऱ्यांदा कोळसा तुटवड्याचा सामना करीत आहेत

नीलेश छाजेड : सकाळ वृत्तसेवा

एकलहरे : राज्यातील वीज केंद्रे सहा महिन्यांच्या कालावधीत दुसऱ्यांदा कोळसा तुटवड्याचा सामना करीत आहेत. कोळसा तुटवड्यामुळे चंद्रपूरचे दोन संच बंद ठेवण्यात आले असून, बाकी संच निम्म्याहून कमी क्षमतेने वीज निर्मिती करीत असल्याचे चित्र आहे.कोरोना काळात गेल्या दोन वर्षात जास्तीत जास्त काळ नागरिकांना घरी थांबवण्यात व वर्क फ्रॉम होमसाठी मदत करण्यात यशस्वी ठरलेल्या वीज कंपनीचे तीनही भाग निर्मिती, पारेषण व वितरण यांचे योगदान महत्वाचे ठरले होते.

मात्र, पावसाळ्यात महानिर्मितीला कोळसा तुटवड्याचे ग्रहण लागले. त्यातून सावरत नाही, तोच आता पुन्हा कोळसा तुटवड्याला सामोरे जावे लागत असून, चंद्रपूर येथील संच क्रमांक तीन व चार बंद ठेवावे लागले आहे. तर औष्णिकची निर्मिती क्षमता ९ हजार ५४० मेगा वॅट असताना ५ हजार ४१८ मेगा वॅट निर्मिती सुरू आहे. नाशिक औष्णिक वीज केंद्राची क्षमता ६३० मेगा वॅट एक संच झिरो शेड्युलमध्ये बंद दोन संचांमधून २२४ मेगा वॅट, कोराडी क्षमता २१९० मेगा वॅट व निर्मिती १७११ मेगावॅट, खापरखेडा क्षमता १३४० मेगा वॅट, तर संच २ व ४ तांत्रिक कारणास्तव बंद, निर्मिती ५७६ मेगा वॅट सुरू, पारस क्षमता ५०० मेगा वॅट निर्मिती २६५ मेगा वॅट, परळी क्षमता ७५० मेगा वॅट, निर्मिती ५०३ मेगा वॅट, चंद्रपूर क्षमता २९२० मेगा वॅट व दोन संच बंद, १ हजार ७७७ मेगा वॅट निर्मिती सुरू, भुसावळ क्षमता १२१० मेगा वॅट व निर्मिती ४६९ मेगा वॅट याप्रमाणे औष्णिकची ५ हजार ४१८ मेगा वॅट वीजनिर्मिती सुरु होती.

खासगी मात्र जोमात

एकीकडे कोळसा तुटवड्यामुळे महानिर्मितीला दोन संच बंद ठेवावे लागल्याचे दिसत असताना खासगी जिंदाल- ५८५ मेगा वॅट, अदाणी- ३ हजार १७४ मेगा वॅट, रतन इंडिया- १ हजार २०९ मेगा वॅट, एसडब्लूजीपीएल- ३४६ मेगा वॅट, धाडीवाल- २८९ मेगा वॅट अशी जोमात वीज निर्मिती सुरू होती.

चंद्रपूर ते डब्लूसीएल कंपनी दरम्यान कोळसा वहन करणाऱ्या रोप वेमध्ये बिघाड झाल्याने दोन संच बंद ठेवण्यात आले होते. दोन दिवसांत परिस्थिती पूर्ववत्‌ होईल.

-पुरुषोत्तम जाधव, संचालक, कोळसा खनिकर्म

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : नागपूरसाठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी पिवळी मारबत मिरवणूक आज निघणार

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT