नागपूर : गंगाजमुना (ganga jamuna area) परिसरात सुरू असलेल्या कायमस्वरुपी वेश्याव्यवसायावर बंदी आणण्याचा निर्णय पोलिस आयुक्त अमितेश कुमार (police commissioner amitesh kumar) यांनी घेत, कलम ७(१) नुसार शनिवारी आदेश काढले. त्यानुसार आठवडाभरातच शुक्रवारी (ता.२९) या परिसरात लकडगंज पोलिसांनी मोठी कारवाई करीत, मुलींना लपविण्यात येणारे दोन भुयार शोधून काढले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
वारांगणांची वस्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या गंगाजमुना परिसरात मोठ्या प्रमाणात राजस्थान आणि इतर ठिकाणाहून आलेल्या मुलींना वेश्याव्यवसायात ढकलण्यात येत असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून गंगाजमुना वस्ती हटविण्याबाबत पोलिसांनी भूमिका घेतली होती. मात्र, याबाबत समर्थन आणि विरोधात मोर्चे काढण्यात आले होते. त्यामुळे परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. त्यानंतर पोलिस विभागामार्फत येथे राहणाऱ्या सामान्य नागरिकांकडून त्याबाबत सूचना आणि आक्षेप मागविण्यात आले होते. याशिवाय पोलिस आयुक्तांनी स्वतः परिसरातील नागरिकांशी संवाद साधला होता. त्या माध्यमातून मिळालेल्या त्या सूचना आणि आक्षेपावरुन पोलिस आयुक्तांनी आपल्या अधिकाराचा वापर करीत या ठिकाणाला सार्वजनिक ठिकाण घोषित करीत, येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर बंदी घालण्यात आली. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी राजस्थान येथील मुलीची तिच्या नातेवाइकांनी विक्री केल्याची बाब लक्षात आली होती. एका ग्राहकांच्या मदतीने त्या मुलीने गंगा जमुना वस्तीतून पळ काढला होता. त्यानंतर त्या मुलीने लकडगंज पोलिसांना या भुयाराची माहिती पोलिसांना दिली. त्यातून पोलिसांनी शुक्रवारी (ता.२९) चार ते पाच वाजताच्या सुमारास गंगाजमुना परिसरात छापा टाकला. कारवाईदरम्यान काही घरात दोन भुयार असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
मुलींना लपवून ठेवण्यासाठी वापर
लकडगंज पोलिसांनी शुक्रवारी केलेल्या कारवाईत, गंगा जमुना येथे मिळाले दोन भुयार आढळून आलेत. या भुयाराचा वापर दलालांकडून पोलिसांच्या कारवाई दरम्यान अल्पवयीन मुलींना लपवण्यासाठी केला जात असल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. वेश्याव्यवसाय मुलींना ओढल्यानंतर त्यांच्यावर अमानवी अत्याचार करण्यासाठी या भुयारांमध्ये मुलींना डांबून ठेवले जात असल्याची शक्यता यावेळी त्यांनी वर्तविली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.