Jayant Dubale and Shruti Kadwala sakal
नागपूर

Shiv Chhatrapati Award : दोन नागपूरकर जयंत दुबळे व श्रुती कडवला यानां राज्य शासनाचा ‘शिवछत्रपती’ पुरस्कार घोषित

Shiv Chhatrapati Award : जयंत दुबळे व श्रुती कडवला यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला, ज्यामुळे नागपूरच्या क्रीडा क्षेत्रात नवा प्रकाश पडला आहे. हे पुरस्कार त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्याची मान्यता दर्शवतात.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या नागपूरच्या दोन खेळाडूंना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार घोषित झाला आहे. पुरस्कार मिळालेल्यांमध्ये आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू जयंत दुबळे व आंतरराष्ट्रीय महिला आट्यापाट्या खेळाडू श्रुती कडवचा समावेश आहे.

राज्य शासनाने २०२२-२३ या वर्षासाठी गुरुवारी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. यात जयंत व श्रुती या दोन नागपूरकर खेळाडूंचा समावेश आहे. २४ वर्षीय जयंतने सप्टेंबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या एका वर्षात तब्बल तीन आंतरराष्ट्रीय खाडी यशस्वीरीत्या पोहण्याचा अनोखा पराक्रम केला होता.

दोन नागपूरकरांच्या पाठीवर शाबासकीची थाप

यात ७० किमी अंतराची टू वे इंग्लिश खाडी, ३३ किमी अंतराची पॅसिफिक महासागरातील कॅटलिना खाडी आणि ३५ किमी अंतराच्या नॉर्दर्न आयर्लंड दरम्यानच्या नॉर्थ चॅनेलचा समावेश आहे. याशिवाय त्याने भारत-श्रीलंका खाडीसह इतरही अनेक सागरी जलतरण स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. डॉ. दीपक कवीश्वर व अमरकांत चकोले यांच्या मार्गदर्शनात घडलेल्या २४ वर्षीय श्रुतीने आतापर्यंत पाच राज्य व चार राष्ट्रीय सीनियर आट्यापाट्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय नुकत्याच भूतान येथे झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेतही सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचीही ती सदस्य होती.

सर्वेशला आट्यापाट्यासाठी पुरस्कार

अमरावतीच्या पन्नालालनगर येथील वीर अभिमन्यू मंडळाचा खेळाडू सर्वेश रवींद्र मेन याला आट्यापाट्या खेळासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याला राज्य आट्यापाट्या महामंडळाचे उपाध्यक्ष व मार्गदर्शक प्रा. डॉ. श्रीधर धाकुलकर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

प्रदीप गंधेंचे ‘नागपूर कनेक्शन’

पुरस्कार विजेत्यांमध्ये मूळचे नागपूरचे व सध्या मुंबईत स्थायिक झालेले माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे यांचाही समावेश आहे. त्यांना उल्लेखनीय योगदानासाठी शिवछत्रपती जीवनगौरव क्रीडा पुरस्कार देण्यात आला आहे. महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष राहिलेले गंधे यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला पदक मिळवून दिले होते.

राज्य शासनाने प्रतिष्ठेच्या छत्रपती पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल खूप आनंद झाला. हा पुरस्कार आतापर्यंतच्या मेहनतीचे फळ आहे. यामुळे काहीशा दुर्लक्षित असलेल्या सागरी जलतरणाला नवी उभारी मिळून भविष्यात अनेक युवा जलतरणपटू सागरी जलतरणाकडे आकर्षित होतील, अशी मला खात्री आहे. मलाही चांगली कामगिरी करण्यासाठी ‘मोटिव्हेशन’ मिळेल.

-जयंत दुबळे, आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT