नागपूर

महिलेसाठी युवक ठरले देवदूत; वाचवला तिच्यासह तीन मुलांचा जीव

अनिल कांबळे

नागपूर : रात्री साडेदहाची वेळ... तिशीतील महिला तीन मुलांना घेऊन गांधीसागर तलाव परिसरात अस्वस्थपणे फिरत होती... दोन युवकांचे तिच्या हालचालींकडे लक्ष गेले... ही महिला अचानक तलावाच्या दिशेने लगबगीने निघाली... ती मुलांसह पाण्यात उडी घेण्याच्या तयारीत होती... दोघांनीही धावत तिला गाठले. मुलांना पकडले आणि तिला रोखले... पोलिसांना फोन केला आणि ताब्यात दिले... समुपदेशन केल्यानंतर चुकीची जाणीव महिलेला झाली. ते दोन्ही युवक महिला आणि मुलांसाठी देवदूत ठरले. (Two-youths-save-life-a-woman-and-three-children)

गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ३० वर्षीय महिला पतीच्या त्रासाला कंटाळली होती. बेरोजगार आणि दारूडा पती रोज मारहाण करीत होता. तीन चिमुकल्यांना आधार देण्यासाठी ती पतीचा त्रास सहन करत होती. मात्र, सततच्या त्रासाला ती कंटाळली होती. १८ जूनला रात्री नऊ वाजता दारूच्या नशेत पतीने तिला जबर मारहाण केली. त्यामुळे तिच्या मनात आत्महत्येचे वादळ घोंगावू लागले.

तीन मुलांच्या भविष्याची चिंता सतावत असल्याने तिने मुलांसह आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. रात्री साडेदहा वाजता घराबाहेर पडून मुलांसह तिने गांधीसागर तलाव गाठला. लगबगीने तलावाच्या दिशेने निघाली. याच वेळी तेथे शतपावली करणारे कुणाल झाडे आणि अभिनव ढोबळे यांनी ती दिसली.

मुलांसह आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या महिलेच्या दिशेने दोघांनीही धाव घेतली. कुणालने मुलांना तर अभिनवने महिलेला अडवले. तिची समजूत घातली. तिने आपबिती सांगितली. त्यांनी गणेशपेठ पोलिसांना माहिती देत महिला आणि मुलांना त्यांच्या ताब्यात दिले. समुपदेशन केल्यानंतर महिलेला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

रागाच्या भरात माझ्याकडून घोडचूक होणार होती. ऐनवेळी कुणाल आणि अभिनव देवदूतासारखे मदतीला आले. आता मी मुलांच्या भविष्यासाठी जगेल आणि लढेल. मुलांना मोठे करून आयुष्याला नवी दिशा देईल.
- पीडित महिला

(Two-youths-save-life-a-woman-and-three-children)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT