नागपूर

Uday Samant: लेंडी तलाव विकासातील अडथळे दूर करा! मंत्री उदय सामंत यांचे महापालिकेला निर्देश

शहरातील ऐतिहासिक लेंडी तलावास पुनर्जीवित करण्यासाठीचा मुद्दा तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून सदस्य अभिजित वंजारी यांनी बुधवारी (ता.१३) उपस्थित केला.

सकाळ डिजिटल टीम

Uday Samant directs Municipal Corporation: शहरातील २.६ हेक्टर परिसरातील लेंडी तलावाला पुनर्जीवित करण्यासाठी केंद्र पुरस्कृत अमृत २.० अभियानातून या तलावाचे पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. परंतु विकास कामे करताना स्थानिकांच्या अडचणी येत आहेत. त्या अडचणी दूर करण्यासंदर्भात महापालिकेला निर्देश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री यांच्यावतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.

शहरातील ऐतिहासिक लेंडी तलावास पुनर्जीवित करण्यासाठीचा मुद्दा तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून सदस्य अभिजित वंजारी यांनी बुधवारी (ता.१३) उपस्थित केला. वंजारी यांनी सभागृहाला सांगितले की, लेंडी तलावाची दुरवस्था झाली आहे. तिथे आता कोणते काम सुरू झाले ते सरकारने सांगावे. या प्रश्नाला उत्तर देताना सामंत म्हणाले, अमृत योजनेतून या तलावाचे काम हाती घेण्यात आले आहे.(Latest Marathi News)

यामध्ये प्रत्येकी ३.५३ कोटी राज्य आणि केंद्र सरकारचे तर ७.०७ कोटी हे महापालिकेचा हिस्सा आहे. मध्यंतरीच्या काळात या तलावातून गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले तेव्हा, नागपुरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे काही दिवस काम थांबविण्यात आले होते. आता संबंधित कंत्राटदाराने पुन्हा गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. पण स्थानिकांकडून काही अडचणी निर्माण होत आहे.

त्यामुळे स्थानिक प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. वंजारी यांनी लेंडी तलावातील गाळ काढण्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावून कामावर लक्ष ठेवा, अशी मागणी केल्यानंतर मात्र सामंत यांनी गाळ काढला किंवा नाही, याची पाहणी करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहे. सोबतच या प्रकल्पाचे आजमितीस कोणतेही देयक कंत्राटदारास देण्यात आले नसल्याचेही स्पष्ट केले. या चर्चेत सदस्य प्रवीण दटके यांनीही सहभाग घेतला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Kolhapur Crime : शेतात कामासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग, शरीरसुखास नकार दिल्याने निर्घृण खून; खिशावरील 'त्या' डागाने उलगडलं धक्कादायक रहस्य

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

SCROLL FOR NEXT