Congress MLA Raju Parwe Esakal
नागपूर

Congress MLA Raju Parwe: दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा फडणवीसांची भेट; आज शिवसेनेत प्रवेशाच्या चर्चा, काँग्रेसचे आमदार राजू पारवे शिवसेनेच्या वाटेवर?

Congress MLA Raju Parwe: नागपूरमधील उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे आज शिवसेना शिंदे गटात किंवा भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. राजू पारवे शिवसेनेतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Congress MLA Raju Parwe: लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारीवरून अनेक मतदारसंघात नाराजीनाट्य दिसून येत आहेत. अशातच अनेक नेते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर करत आहेत. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, शरद पवार गट यांच्या पक्षातून अनेक नेते भाजपमध्ये जाताना दिसत आहेत. अशातच नागपूरमधील उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे आज शिवसेना शिंदे गटात किंवा भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. राजू पारवे शिवसेनेतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. रामटेकची जागा शिवसेनेकडे जाणार असल्याचं बोललं जात आहे.

तर ही जागा भाजपला सुटली तर काँग्रेसचे आमदार राजू पारवे हे भाजपचा चेहरा ठरतील की शिंदे गटाचा उमेदवार ठरतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राजू पारवे यांनी गुरुवारी उशिरा रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. पारवे भाजपमध्ये जाणार आणि त्यांना भाजपकडून रामटेक लोकसभेची उमेदवारी दिली जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात अनेक दिवसांपासून सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर फडणवीस आणि पारवे यांची भेट महत्त्वाची आहे.

राजू पारवे आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता

राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात असताना राजू पारवे आज शिवसेनेत प्रवेश करणार करणार असल्याचं बोललं जात आहे. पारवे धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. रामटेक हा मतदार संघ अनुसूचित जाती साठी राखीव आहे.

सध्या या ठिकाणी शिवसेनेचे कृपाल तुमाने खासदार आहेत. महायुतीच्या जागा वाटपात भाजपला ही जागा हवी आहे. मात्र, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान राजू पारवे कोणत्या पक्षात जाणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Controvarsy: शुभमन गिलला कॅप्टन व्हायचं नव्हतं, रोहित शर्माकडून BCCI ने ते हिसकावून घेतले; अजित आगरकर व निवड समितीने प्रचंड दबाव आणला...

मी दमलीये! लग्नानंतर आशुतोष यांच्या पाहुण्यांना कंटाळलेल्या रेणुका शहाणे; शेवटी एके दिवशी रागात...

AAP Bihar Candidate List : बिहार निवडणुकीसाठी 'AAP'ने वाजवला बिगुल!, पहिली उमेदवार यादी केली जाहीर

Mumbai Police: मुंबईत २९ दिवस ड्रोन आणि कंदील उडवण्यावर बंदी; दिवाळीपूर्वी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर!

RBI ECL Rule: आरबीआयच्या नवीन नियमांमुळे खासगी बँकांचे कर्ज महागणार? कोणत्या बँकांवर होणार परिणाम?

SCROLL FOR NEXT