Underworld don Arun Gawli had to undergo corona test 
नागपूर

दगडी चाळीतून खासगी गाडीने नागपूरकडे निघाला डॅडी, मात्र शहरात पोहोचताच...

केतन पळसकर

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी (डॅडी) 3 जून रोजी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शरण आला. मात्र, गवळी मुंबई येथून आला असल्याने कारागृह प्रशासनाने त्याला ताबडतोब प्रवेश न देता सर्वप्रथम त्याची कोरोनाची तपासणी केली, अशी माहिती त्याचे वकील ऍड. मीर नगमान अली यांनी दिली.

13 मार्च रोजी अरुण गवळीला नागपूर खंडपीठाने 45 दिवसांची पॅरोल रजा मंजूर केली होती. लॉकडाऊन घोषित झाल्याने त्याने दोनचा पॅरोलसाठी अर्ज केला आणि रजा वाढवून घेतली. तिसऱ्यांदा मात्र न्यायालयाने त्याची विनंती फेटाळून त्याला मुंबई येथील तळोजा कारागृहामध्ये शरण येण्याचे आदेश दिले. परंतु, तळोजा कारागृहाने कोरोनाच्या भीतीमुळे गवळीला प्रवेश नाकारला.

त्याने 29 मे रोजी चौथ्यांदा नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करीत रजा वाढवून देण्याची विनंती केली. न्यायालयाने त्याचे सततचे गाऱ्हाणे न एकता त्याला पाच दिवसांच्या आत नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये शरण येण्याचे आदेश दिले.

त्यानुसार तो 3 जून रोजी कारागृहामध्ये शरण गेला. गवळी राहत असलेल्या दगडी चाळीत 26 कोरोनाचे रुग्ण आढळल्याने मुंबई येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने डॅडीला 20 मेपासून ते 2 जूनपर्यत क्वारंटाईन केले होते. त्यामुळे नागपुरात येताच त्याची मेडिकलमध्ये कोरोना चाचणी घेण्यात आली. कोरोना तपासणीचे अहवाल येईपर्यंत त्याला कारागृहातील वेगळ्या कोठडीमध्ये ठेवण्यात आले, अशी माहिती ऍड. मीर नगमान अली यांनी दिली. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे.

खासगी गाडीने गाठले नागपूर

अरुण गवळी याने मुंबई ते नागपूर (मध्यवर्ती कारागृह) हा सुमारे 850 किमीचा प्रवास खासगी गाडीने पूर्ण केला. मुंबईच्या प्रशासनाकडे नागपूर प्रवासाची परवानगी त्याने घेतली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एका दिवसामध्ये त्याची परवानगी मंजूर करण्यात आली.

लॉकडाऊनचा पुरेपूर फायदा

पत्नी आजारी असल्याच्या कारणावरून 13 मार्च रोजी त्याला पॅरोल रजा मंजूर झाली. त्यानंतर लॉकडाऊन घोषित झाल्याने त्याला रजा वाढवून मिळाली. याचाच फायदा घेत तो सुमारे 2 महिने 20 दिवस कारागृहाच्या बाहेर होता. यादरम्यान, त्याची मुलगी योगिताचे लग्न अभिनेता अक्षय वाघमारेशी साध्या पद्धतीने पार पडले. गवळीने यादरम्यान अनेकांना रेशन किट देत मदतसुद्धा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahua Moitra: तुम्ही इतके स्वस्त आहात का? आमच्या लोकांना ४ कोटी आगाऊ अन् दरमहा १ कोटी; ठाकरेंच्या खासदारांना सवाल!

Monorail: मोनोरेल सुरू होणार पण प्रवाशांच्या खिशाला कात्री, तिकीटांच्या किंमती वाढणार? नवे दर किती आणि कधीपासून लागू?

लग्न होऊनही 5 वर्षांपासून लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहतेय रसिका सुनील, नवऱ्याबद्दल बोलताना म्हणाली...

Latest Marathi News Live Update : इम्तियाज जलील यांच्या विधानाला ठाकरे गटाचा पाठिंबा, देशात हुकूमशाही सुरू असल्याचा आरोप

Kolhapur Water Crisis: कोल्हापुरात पाणीबाणी, एकाच वेळी सर्व योजना बंद पडण्याची इतिहासात पहिलीच घटना; भोगावती, पंचगंगेच्या पातळीत मोठी घट

SCROLL FOR NEXT