UPSC passed Shubham Bhaisare Sumit Ramteke Shubham Nagarale from nagpur sakal
नागपूर

UPSC मध्ये उपराजधानीतील तिघांची बाजी

शुभम भैसारे, सुमित रामटेके, शुभम नगराळे चमकले

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये उपराजधानीतीन तिघांनी बाजी मारली आहे. भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूरमधून सहा उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. यामध्ये शुभम भैसारे याला ९७, सुमित रामटेकेला ३५८ तर शुभम नगराळे याला ५६८ वा रॅंक मिळाला आहे. विशेष म्हणजे उपराजधानीच्या निकालाचा टक्काही वाढला आहे.

गेल्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा २०२० ची मुख्य मुलाखत फेरी २ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर २०२१ यादरम्यान घेण्यात आली होती. त्यानंतर २४ सप्टेंबर २०२१ रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या वर्षी मुलाखतीची प्रक्रिया २६ मे २०२२ रोजी संपली. त्यात नागपूरमधील सहा उमेदवारांचा समावेश होता.

युपीएससी सीएसई- २०२१ चा अंतिम निकाल सोमवारी जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. आतापर्यंत इतक्या प्रमाणात उपराधानीतील विद्यार्थ्यांना कधीही यश मिळाले नव्हते. विशेष म्हणजे ९७ वा रॅँक आतापर्यंतचा सर्वाधिक असल्याचे समजते. यापैकी सुमित सध्या केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागात कार्यरत आहे. आता या रॅंकने त्याचा आयएएस होण्याचा मार्ग सोपा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart Sale : डीमार्टमध्ये कोणत्या दिवशी वस्तू खरेदी करणे जास्त स्वस्त आणि फायद्याचे ठरते? जाणून घ्या एका क्लिकवर

Bihar Government: गृहखातं हातातून निसटलं, पण 'हे' मलाईदार विभाग नितीश कुमारांच्या 'जेडीयू'कडे

Sale : सारा जमाना Zudio का दिवाना! पण फक्त झुडिओ नाही, तर टाटाच्या 'या' 5 दुकानांमध्ये मिळतोय हजारोंचा डिस्काउंट; स्पेशल ऑफर्स पाहा

Gondia Crime : वडिलाचा मुलीवर लैंगिक अत्याचार; अत्याचार पीडित मुलीने एका बाळाला दिला जन्म

Gadchiroli News : मारेदुमिल्ली जंगलातील चकमक ‘खोटी कथा’; आमच्या कार्यकर्त्यांना बनावट एनकाउंटरमध्ये मारले—माओवादी पत्रकाचा आरोप!

SCROLL FOR NEXT