

Sonam Wangchuk Health
esakal
Current Health Condition of Sonam Wangchuk : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक मागील २३ दिवसांपासून उपोषण करत आहेत. सध्या ते दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात वैद्यकीय देखरेखीखाली असून, सफदरजंग आणि एम्स (AIIMS) या दोन्ही रुग्णालयांचे डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. डॉक्टरांच्या मते,सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर असली, तरी वैद्यकीय सल्ल्याकडे वारंवार दुर्लक्ष करून त्यांनी शिरेवाटे दिले जाणारे द्रव आणि ग्लुकोज घेण्यास नकार देणे सुरूच ठेवले आहे, अशी माहिती सफदरजंग रुग्णालयाच्या प्रशासनाने मंगळवारी दिली.