Vacancies in vocational courses will be eliminated! 
नागपूर

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांचे ग्रहण सुटणार, वाचा कसे काय...

मंगेश गोमासे

नागपूर : गेल्या काही वर्षांत विदर्भातील अभियांत्रिकीसह तंत्रनिकेतन आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या जवळपास निम्म्या जागा रिक्त राहत होत्या. यावर्षी मुंबईसह पुण्यात कोरोनाचे संकट गंभीर आहे. शिवाय गुरुवारी लागलेल्या बारावीच्या निकालात 9.14 टक्‍क्‍याने वाढ झाली आहे. या दुहेरी संधीचा फायदा विदर्भातील व्यावसायिक अभ्यासक्रमातील महाविद्यालयांना होण्याची शक्‍यता असून, येथील रिक्त जागा कमी होण्याची चिन्हे आहेत.

अभियांत्रिकी, व्यवस्थापन, पॉलिटेक्‍निक यासह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशासाठी पुणे आणि मुंबई येथील महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची पहिली पसंती असते. त्यामुळे एमएच-सीईटीसह इतर प्रवेश पात्रता परीक्षांचे निकाल लागताच, विद्यार्थी प्रवेशासाठी पुणे, मुंबईच्या दिशेन जातात. पालकांकडून या ठिकाणच्या महाविद्यालयात प्रवेशासाठी डोनेशन देण्याची तयारी असते. याचाच परिणाम म्हणून गेल्या सहा ते सात वर्षांपासून विदर्भातील महाविद्यालयांवर रिक्त जागांचे संकट ओढवले आहे.

यावर्षीही अशीच परिस्थिती असेल अशी संस्थाचालकांसह शिक्षक आणि प्राचार्यांना वाटत होते. मात्र, मार्च महिन्यापासून पुणे, मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा परिस्थितीत पालक नागपुरातील महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या मनःस्थितीत आहेत. त्यामुळे एमएचसीईटनंतर पालकही विदर्भातील अभियांत्रिकी महाविद्यालयांनाच पसंती देतील अशी शक्‍यता आहे.

दुसरीकडे काल जाहीर झालेल्या निकालात नागपूर विभागातील उत्तीर्णांची टक्केवारी 9.14 एवढी वाढली आहे. शिवाय विज्ञान शाखेचा निकालही वाढला आहे. विज्ञान शाखेत 67 हजार 742 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याची टक्केवारी 98.08 आहे. त्यामुळे महाविद्यालयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.


सीईटीकडे लक्ष
अभियांत्रिकी, फार्मसी व आर्किटेक्‍चर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येत असलेली "एमएचसीईटी' कोरोनामुळे लांबणीवर पडली आहे. त्यामुळे सध्या या शाखेतील प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असून परीक्षेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

निकालातील वाढ
शाखा - 2019 - 2020
विज्ञान - 89.44- 98.08
वाणिज्य - 86.79 - 91.70
कला - 73.61 - 84.61
एमसीव्हीसी - 78.70 - 87.47


नागपूर आणि विदर्भात नोकरीची चांगली संधी आहे. बरीच नामवंत महाविद्यालये आहेत. शिवाय अनेक उद्योजक येथे उद्योग सुरू करण्यास उत्सुक असल्याने आता विद्यार्थ्यांनी पुणे, मुंबईकडे न जाता येथेच प्रवेश घेत संधीचे सोने करावे.
- डॉ. आमिषी अरोरा, संचालक, सेट्रल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट रिसर्च ऍन्ड डेव्हलमेंट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT