लसीकरण  sakal news
नागपूर

नागपूरात १४ केंद्र, ३३ शाळा, महाविद्यालयातून होणार लसीकरण

आजपासून १५ ते १८ वयोगटासाठी मोहीम; ऑनलाइन, ऑफलाइन नोंदणी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरातील १५ ते १८ वयोगटासाठी उद्यापासून लसीकरणाला(vaccination) सुरवात होणार आहे. महापालिकेने(nagpur carporation) काल जाहीर केलेल्या सात केंद्रांमध्ये आज आणखी सात केंद्रांची भर घातली. त्यामुळे आता १४ स्थायी केंद्रांसह ३३ शाळा, महाविद्यालयातून लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी आधार कार्ड, मोबाईल आवश्यक असून शाळा, महाविद्यालयातील केंद्रांवर ऑनलाइन नोंदणीची(online registration) गरज नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.

दहावी ते बारावीतील विद्यार्थ्यांचे वय १५ ते १८ आहे. त्यामुळे महापालिकेने शैक्षणिक संस्थांनाही लसीकरण शिबिरासाठी विनंती केली. महापालिकेच्या विनंतीला शाळा, महाविद्यालय संचालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ३३ शाळा, महाविद्यालयांनी लसीकरणासाठी पुढाकार घेतला. या ३३ शाळांमधील १६ हजार ३२ विद्यार्थ्यांचे लसीकरण शाळेतच करण्यात येणार आहे. १४ केंद्रांवर उद्यापासून सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोवॅक्सिन लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाईन नोंदणी अनिवार्य असून शैक्षणिक संस्थांमधील केंद्रांवर ऑनलाइन नोंदणीची गरज नाही.

लसीकरणास पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाताना स्वत:चे आधार कार्ड आणि मोबाईल आवश्यक आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुले आणि मुलींचे लसीकरण मोहिमेला महापौर दयाशंकर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या, सोमवारी सकाळी १०.३० वाजता राजकुमार गुप्ता समाजभवन, बजेरिया येथे प्रारंभ होईल. शैक्षणिक संस्थांमधील केंद्रावर विद्यार्थ्यांची नोंदणी करून त्यांना लस देण्यात येईल. केंद्रावर विद्यार्थ्यांना अर्धा तास डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवले जाईल.

या चौदा केंद्रावर लसीकरण

  1. मेडिकल एम्स,

  2. गांधीनगरातील मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय

  3. एम्समधील आयुष इमारत

  4. दिघोरीतील प्रगती सभागृह

  5. आयसोलेशन हॉस्पिटल

  6. कामठी रोडवरील डॉ. आंबेडकर रुग्णालय

  7. सच्चिदानंदनगर उद्यान

  8. स्व. प्रकारराव दटके महाल रोगनिदान केंद्र

  9. दीक्षाभूमी, हंसापुरी आयुर्वेदिक दवाखाना

  10. केटीनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र

  11. पाचपावली सूतिकागृह आणि मध्य रेल्वे रुग्णालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike: दसरा-दिवाळीआधीच दूध महागणार? तब्बल 8 रुपयांची वाढ! सरकारला 3 दिवसांचा अल्टिमेटम

Asian Games 2026: मुंबईच्या पोरीची जपानमध्ये हवा! Quimcy Dsouza ऐतिहासिक पदक जिंकण्याच्या उंबरठ्यावर; ती खेळते, तो Teqball नक्की आहे तरी काय?

शेतकरी दुष्काळाने होरपळतोय, नेते खातायत सुकामेवा, आढावा बैठकीत काजू बदामचा नाश्ता

IIT Bombay ChatGPT Incident : IIT बॉम्बे विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर अधिकृत खुलासा; शिस्तभंगाची कारवाई केली होती का? संस्थेने सांगितलं सत्य

प्रसूतीनंतर ५० दिवस मृत्यूशी झुंज, स्तनदा मातेला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न; उपचारानंतर मिळालं जीवनदान!

SCROLL FOR NEXT