Pix_Pratik
नागपूर

लस आली हो! ४५ वर्षांवरील नागरिकांचे आज लसीकरण

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारकडून (Maharashtra Government) शहराला लसीचा (Corona Vaccine) साठा प्राप्त झाले. त्यामुळे रविवारी ९६ लसीकरण केंद्रावर ४५ वर्षावरील नागरिकांना लस उपलब्ध होणार आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तिसाठी नऊ केंद्रावर लसीकरणाची (Corona Vaccination) सुविधा आहे. काल ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण बंद होते. (Vaccination of 45 above people today in Nagpur)

४५ वर्षावरील नागरिकांना उद्या, रविवारी लस घेता येणार आहे. मेयो, एम्समध्ये कोव्हिशिल्ड दिली जाईल. शासकीय व मनपाच्या ९६ केंद्रावर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल, ही माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. ४५ वर्षावरिल नागरिकांना दूसऱ्या डोससाठी प्राधान्य दिले जाईल. ज्या नागरिकांचा दूसरा डोस शिल्लक आहे, त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

१८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तिसाठी ९ केंद्रावर लसीकरण होईल. महाल रोगनिदान केंद्र, छापरूनगर सर्वोदय मंडळ हॉल, बजेरिया येथील राजकुमार गुप्ता समाज भवन, मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोव्हक्सींन लस उपलब्ध राहणार आहे. पाचपावली सुतिकागृह रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर व आयसोलेशन हॉस्पीटल इमामवाडा येथे कोव्हीशिल्ड लसीकरण करण्यात येईल.

विशेष म्हणजे १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून जी वेळ देण्यात आली आहे, त्याच वेळेत त्यांनी उपस्थित राहावे. केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

(Vaccination of 45 above people today in Nagpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT