vaccination process smooth on friday in nagpur 
नागपूर

'एक दिवस निघाला रे बाबा'; शुक्रवारी लसीकरण सुरळीत, तर कोव्हिशिल्डचा फक्त आजपर्यंतचा साठा

केतन पळसकर

नागपूर : राज्यामध्ये लसींचा तुटवडा असताना शहरातील लसीकरण शुक्रवारी सुरळीत पार पडले. त्यामुळे, यंत्रणेसह लस घेणाऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. केंद्र शासनातर्फे कोरोनावर आळा घालण्यासाठी आवश्‍यक असलेल्या लसींचा साठा राज्याला अल्प प्रमाणात दिला. त्यामुळे, कोव्हिशिल्ड लसीचा केवळ शनिवार पर्यंतचा साठा शहरामध्ये उपलब्ध आहे. 

शहरामध्ये एकूण ८९ खासगी आणि शासकीय केंद्रांवर आजवर लसीकरण सुरू होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी कोव्हॅक्सिनचा साठा संपल्याने ५ केंद्रांवर लसीकरण बंद होते. तर, इतर ८४ केंद्रांवर लसीकरण सुरळीत पार पडले. राज्यामध्ये लसीचा तुटवडा असल्याच्या बातम्या गुरुवारी माध्यमांद्वारे नागरिकांना कळल्यानंतर नोंदणी केलेल्या नागरिकांनी शुक्रवारी लसीकरणाबाबत चौकशी केली. 

रूग्णालय प्रशासन सज्ज - 
केंद्र शासनाने तीन एप्रिल रोजी कोरोना योद्ध्यांच्या लसीकरणाला थांबा दिल्यानंतर काही लसीकरण केंद्रांवरील आकडा कमी झालेला पाहायला मिळाला. त्यामुळे, दररोज नऊशेच्या जवळपास लसीकरण होणाऱ्या महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये शुक्रवारी ५८० नागरिकांनी लसीचा डोस घेतला. तर, उद्याच्या लसीकरणासाठी रुग्णालय प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती शहरातील रुग्णालयांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला! सर्वोच्च धावसंख्या, भारताविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड; कॅम्बेल, होप अन् जांगूचे शतक, ४०० पार

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून येईल चीड; राजकुमार रावही जबरदस्त, 'प्रहार' चा ट्रेलर बनला चर्चेचा विषय

SCROLL FOR NEXT