नागपूर

युवा सेनेतील भय्या-भाऊ वाद टोकाला; उद्या वरुण सरदेसाई नागपुरात

राजेश चरपे

नागपूर : युवा सेनेमधील भय्या-भाऊ वाद टोकाला पोहोचला आहे. दोघांमध्ये दोन दिवसांपूर्वी संघटक विस्तारकासमोर झालेल्या खडाजंगीची तक्रार मुंबईपर्यंत गेली. याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी गुरुवारी (ता. १९) युवा सेनेचे राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई नागपुरात येत आहे. गुरुवारी रविभवन येथे वरुण सरदेसाई युवा सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. त्यांच्यासोबत मुंबईवरून कार्यकारी सदस्य रूपेश कदम हेही येत आहेत. वाद मुंबईपर्यंत पोचल्यामुळे कुणाची गच्छंती होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचे शहरातील काही पदाधिकारी युवा सेनेमध्ये हस्तक्षेप करीत आहे. आपल्या कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत घुसविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी आहेत. याच कारणामुळे १५ ऑगस्टला गणेशपेठ येथील शिवसेनेच्या कार्यालयात संघटक विस्तारकासमोरच दोन गट आपसात भिडले होते. याची तक्रार मुंबईपर्यंत पोचली आहे.

शहरात युवा सेनेचे दोन जिल्हा प्रमुख आहेत. विक्रम राठोड याच्याकडे उत्तर, मध्य आणि पूर्व नागपूर तर हितेश यादव याच्याकडे दक्षिण, दक्षिण-पश्चिम आणि पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. दोन्ही जिल्हा प्रमुखांमध्ये आपसात पटत नाही. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

वरुण देसाई यापूर्वीही नागपूरला येऊन गेले होते. त्यांनी नागपूर जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली. मात्र, शहरातील गटबाजीमुळे नाराज होऊन त्यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याचे टाळले होते. नंदनवन येथे आयोजित संवाद कार्यक्रमात देसाई यांना गटबाजीचा अंदाज आला होता. कार्यक्रमात नियोजनाचा अभाव दिसून आला. याबाबत त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

कार्यकारिणीचा विस्तार रखडला

युवा सेनेची जिल्हा कार्यकारिणी वरुण देसाई यांच्या उपस्थितीतच जाहीर करण्यात आली आहे. हर्शल काकडे यांना तिसऱ्यांदा जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांच्याकडे हिंगणा, सावनेर व काटोल मतदार संघाची जबाबदारी सोपविली आहे. मात्र, शहरातील वाद बघून त्यांनी निर्णय राखून ठेवला.

सेनेचे काँग्रेसीकरण

शिवसेनेचे काँग्रेसीकरण सुरू आहे. कालपरवा आलेल्यांना पदे दिली जात आहेत. आम्ही अनेक वर्षांपासून काम करीत आहोत. आम्हालाच कार्यकारिणीतून हाकलण्याचे प्रयत्न केले जात आहे. यातून भय्या-भाऊ वाद निर्माण झाल्याचे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iran-israel conflict: होर्मुझमध्ये ७०० तेल टँकर अडकले! जगात तेल संकटाची भीती; भारताकडे किती दिवसांचा साठा?

Team India Schedule: ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाचे वेळापत्रक; अफगाणिस्ताननंतर कोणकोणत्या संघाला भिडणार, घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : पुण्याच्या आनंदनगर उड्डाण पुलावर अपघात

Rashmika & Vijay : रश्मिका–विजयचा विवाहसोहळ्यानंतर गावात पूजाअर्चा, देशभर अन्नदान

Iran Israel War: युद्धाच्या छायेत युपीचे ६ हजार कामगार सुरक्षित! योगी सरकारची मोठी घोषणा; मदतीसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

SCROLL FOR NEXT