bajar 
नागपूर

भाजीबाजार भरतो रस्त्यावर, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, वरून चोरांचा सुळसुळाट

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महापालिकेने झोननिहाय भाजीबाजार भरविण्याचा पर्याय स्वीकारला. त्यासाठी रीतसर वेळ व मुबलक जागाही ठरवली. लक्ष्मीनगर झोनसाठी जयताळा मैदानाची निवड झाली. मात्र, असे असूनही निम्म्याहून अधिक भाजी बाजार रस्त्यावर लागतो आहे. इतकेच काय तर बाजार लागण्यास सुरुवात झाल्यापासून या भागातील चोरीच्या प्रयत्नांत वाढ होत असल्याचे येथील नागरिकांच्या निदर्शनात आले आहे.
कोरोनाचा प्रवेश झाला अन्‌ शहर लॉकडाउन झाले. हातावर पोट भरणाऱ्या अनेकांनी भाजीविक्रीचा पर्याय स्वीकारला. त्यामुळे प्रत्येक वस्तीतील भाजीविक्रेत्यांची संख्या दुपटीने वाढली. त्यातच महापालिकेने ठोक भाजीविक्रेत्यांना थेट झोननिहाय जागा दिल्याने इतर वेळी रविवारी दिसणारी गर्दी जयताळा बाजारानजीक राहणारे लोक रोज अनुभवत आहेत. विशेष म्हणजे, महापालिकेने बाजार भरविण्याची अनुमती सकाळी पाच ते आठ या वेळेत दिली असून, हा बाजार मैदानात लावणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. शिवाय भाजीविक्रेत्यांचा रात्रीचा मुक्काम स्थानिकांना धोक्‍याचा असल्याची ओरड वस्तीतील लोक करत आहेत. विशेष म्हणजे, गेल्या आठवडाभरात येथील चोरीचे प्रमाण वाढले आहे. अनेक लोक कोयता घेऊन फिरत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या परिसरात प्रचंड भीती निर्माण झाली आहे.

सविस्तर वाचा - बियाणे खरेदी करताय सावधान
चिल्लर भाजीविक्रेते सकाळी मोठ्या प्रमाणात येत असल्याने या भागात सामान्य नागरिकांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा सर्वत्र फज्जा उडतो. स्थानिक नागरिकांनी या भागातील पोलिस बंदोबस्त अजून कडेकोट करण्याची व जयताळा मार्गावर लागणारा भाजीबाजार मैदानात हलविण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake : मनोज जरांगेंचे आंदोलन आरक्षणासाठी नाही तर सरकार पाडण्यासाठी; लक्ष्मण हाके यांचा आरोप

Devendra Fadnavis Warning : ‘’आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, तुमचं तोंड भाजेल’’ ; फडणवीसांचा विरोधकांना कडक इशारा!

जयंत खऱ्या आयुष्यात कसाय? लक्ष्मी निवासच्या जयंतच्या अभिनयाबद्दल बोलताना भाऊ म्हणाला... 'खऱ्या आयुष्यात त्याने झुरळ...'

Latest Maharashtra News Updates live: मनोज जरांगे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात...

Reliance AI: गुगल अन् 'मेटा'सोबत मिळून बनणार ‘रिलायन्स इंटेलिजन्स’, सर्वसामान्यांना असा मिळेल फायदा?

SCROLL FOR NEXT