dr. subhash chaudhary sakal
नागपूर

Nagpur News : कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी पुन्हा निलंबित

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या गलथान कारभारावर चाप लावत विद्यापीठाचे कुलपती म्हणून राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांचे दुसऱ्यांदा निलंबन केले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या गलथान कारभारावर चाप लावत विद्यापीठाचे कुलपती म्हणून राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांचे दुसऱ्यांदा निलंबन केले. २७ जूनला त्यांना चौकशीसाठी कुलपती बैस यांच्या कार्यालयात बोलाविण्यात आले होते.

डॉ. चौधरी यांच्यावर बाविस्कर समितीने ठपका ठेवल्यावर त्या चौकशीच्या आधारे त्यांचे २१ फेब्रुवारी २०२४ रोजी पहिल्यांदा निलंबन करण्यात आले होते.

त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिल्यावर न्यायालयाने निलंबन रद्द केले होते. मात्र, त्यानंतर कुलपती कार्यालयातून विद्यापीठात कुलगुरूंच्या आर्थिक कारभाराचे लेखा परीक्षण करण्यासाठी खासगी संस्थेला पाठविण्यात आले होते.

त्यानंतर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक हांडे यांच्याकडून चौकशी करण्यात आली. त्या चौकशी अहवालाच्या आधारावर कुलपतींनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत चौकशीस हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यांनी यालाही उच्च न्यायालयात आव्हान दिले.

या प्रकरणावर सोमवारी (ता. २४) न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली. दरम्यान सरकारी पक्षाने याचिका फेटाळण्याची विनंती केली. चौधरी यांनी मागच्या वेळी चौकशी नियमानुसार झाली नसल्याचा दावा करत याचिका केली होती. यंदा सर्व नियमांचे पालन करून चौकशी प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

चौधरी यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी दिली जात आहे. केवळ कारणे द्या नोटीसच्या आधारावर ही याचिका करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही बाब बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला. दुसरीकडे, चौधरी यांच्या वकिलांनी हा युक्तिवाद फेटाळून लावला.

न्यायालयाने याप्रकरणी सुभाष चौधरी यांच्या चौकशीवर अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे चौधरी यांना चौकशीला सामोरे जावे लागणार हे निश्चित झाले होते. त्यानंतर कुलपतींनी त्यांना २७ जून रोजी चौकशीसाठी बोलावले होते. यावेळी डॉ. चौधरींनी आपले म्हणणे लेखी स्वरुपात सादर केल्याची माहिती आहे.

मात्र, यावेळी त्यांनी कुलपतींनी दोन दिवसांची वैद्यकीय रजा मागितल्याने त्यांच्यावर कारवाई झाली नाही. आता कुलगुरू डॉ. चौधरींवर कुलपती काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यानंतर आज निलंबनाचे आदेश धडकले.

अतिरिक्त कार्यभार कुणाकडे?

कुलपतींनी कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांचे निलंबन केल्यावर आता या पदाची अतिरिक्त जबाबदारी कुणाकडे देण्यात येईल याबाबत राज्यपालांकडून अधिकृत पत्र आलेले नाही. गेल्यावेळी या पदाचा अतिरिक्त कार्यभार गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बोकारे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT