vidarbha first test tube baby became an engineer nagpur e sakal
नागपूर

Nagpur News : विदर्भातील पहिले टेस्ट ट्यूब बेबी ‘बाळ’ झाले इंजीनिअर

विज्ञानाची किमया : ९ सप्टेंबर १९९७ ला झाला होता नागपुरात जन्म

केवल जीवनतारे ः @kewalsakal

नागपूर : वंध्यत्वामुळे संततीसुखाला पारखे झालेल्या जोडप्यांसाठी २६ वर्षांपूर्वी नागपुरात १९९७ मध्ये उभारलेले ‘टेस्ट ट्यूब बेबी’ केंद्र वरदान ठरले. विदर्भातील या पहिल्या केंद्रात ९ सप्टेंबर १९९७ रोजी पहिल्या ‘टेस्ट ट्यूब बेबी’चा जन्म झाला. तेव्हाचे हे बाळ आता २६ वर्षांचे झाले असून इंजीनिअर बनले आहे.

उपराजधानीत डॉ. नटचंद्र चिमोटे यांचे पहिले टेस्ट ट्यूब बेबी सेंटर १९९७ मध्ये सुरू झाले. सध्या विदर्भात सुमारे ५० आयव्हीएफ सेंटर आहेत. दहा टक्के बाळांचा जन्म याद्वारे होत आहे. यातून विदर्भात आतापर्यंत सात ते आठ हजार जोडप्यांना संततीसुख मिळाले.

पूर्वी या प्रक्रियेसाठी लागणारा खर्च पेलवणारा नव्हता, परंतु तंत्रज्ञानाच्या विकासामुळे ही पद्धत अधिक सुलभ झाली. गरिबांच्या आवाक्‍यात ही उपचारपद्धती आली आहे. अनेक दांपत्यांनी आयव्हीएफ तंत्राचा पर्याय स्वीकारला आहे.

वर्षभरात ५ हजार बाळांचा जन्म उपराजधानीत वर्षभरात सामान्यरित्या एकूण बाळ जन्माला आलेल्यांची संख्या ५० हजार असून आयव्हीएफद्वारे वर्षाला जन्माला येणाऱ्यांसंख्या ५ हजार आहे.

आईच्या चेहऱ्यावरील समाधान अनमोल

स्त्री घरात साऱ्यांची काळजी घेते. म्हणून आपण आनंदी असतो. मात्र संततीसुख मिळाले नाही तर कुटुंबासह समाजात लोकं टोमणे मारतात. अशावेळी आयव्हीएफच्या माध्यमातून आई होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यात यश आल्यानंतर ती माता कुशीत बाळ घेऊन घरी निघते, त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरील समाधानाला मोल नसते. ते समाधान २६ वर्षांपासून आम्ही अनुभवतोय, असे डॅ. चिमोटे म्हणाले.

आधी मूल होण्यासाठी दाम्पत्य हे साधू, बैरागी यांच्याकडून अघोरी उपचार करून घेत होते. मुल होण्यासाठी वैद्यकीय उपचार उपयोगी पडतात. यामुळे भोंदू समजुतीपासून दूर राहावे. पोटात वाढणारा गर्भ मुलगा की मुलगी हे, स्त्री पुरुष बीज एकत्र येत असतानाच ठरते. हे लिंग कोणीही आणि कोणत्याही उपायाने बदलू शकत नाही. गावखेड्यापर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचले आहे.

- डॉ. नटचंद्र चिमोटे, आयव्हीएफ तज्ज्ञ, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: आनंदाची बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दहा पदरी होणार; चार नव्या लेनसाठी राज्य सरकारचं नियोजन काय?

Stock Market Closing : बाजारातील तेजी सलग सहाव्या दिवशीही कायम; निफ्टीने ओलांडला 26000 चा टप्पा; कोणते शेअर्स फायद्यात?

Viral Video: शिल्पा शेट्टीची 'बिबट्या साडी' पाहिलीत का? लाल साडीत हॉट अंदाज, अन् पदरावर भला मोठा बिबट्या

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

SCROLL FOR NEXT