Aditya Thackeray sakal
नागपूर

विदर्भातील युवकांना विमान उड्डाण क्षेत्रात संधी - आदित्य ठाकरे

मंत्री आदित्य ठाकरे : वैमानिक प्रशिक्षणाचा प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : येथील उड्डाण क्लबची गौरवशाली परंपरा असून हा क्लब पुनरुज्जीवित झाल्यामुळे विदर्भातील युवकांना विमान उड्डाण प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. नागरी उड्डाण क्षेत्रात जागतिक स्तरावर निर्माण होत असलेल्या विविध संधींचा लाभ घेण्याचे आवाहन पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात असलेल्या नागपूर उड्डाण क्लबच्या हॅंगरमध्ये वैमानिक प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष प्रारंभ ठाकरे यांचे हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत होते. यावेळी इतर मागासवर्गीय कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार कृपाल तुमाने, आमदार दुष्यंत चतुर्वेदी, आशिष जयस्वाल, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी आर. विमला, महसूल उपायुक्त मिलिंद साळवे आदी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले की, येथील युवकांना विमान उड्डाणाच्या क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होत आहे. विद्यार्थ्यांच्या पंखांना हा क्लब बळ देणार असून या क्षेत्रात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या युवकांसाठी नवे दालन खुले झाले आहे आणि युवक सुद्धा भरारी घेण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले की, मध्यंतरी उड्डाण क्लब बंद झाल्यामुळे शासनाने स्वतःच्या नियंत्रणाखाली आणून परत सुरू करण्याचा प्रयत्न केला. नागपूर उड्डाण क्लब येथे प्रशिक्षणार्थीसाठी पायाभूत सुविधा तसेच मध्य भारतातील सुसज्ज अशी प्रशिक्षण संस्था निर्माण व्हावी, यादृष्टीने शासनाने २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. विजय वडेट्टीवार म्हणाले की, ग्रामीण व शहरी भागातील युवकांना वैमानिक प्रशिक्षणाच्या क्षेत्रात संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महाज्योतीकडून २० विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला असून या क्लबला अडीच कोटी रुपये निधी सुद्धा उपलब्ध करून दिला आहे. चंद्रपूर येथे सुद्धा उड्डाण क्लब सुरु करण्यासाठी डीजीसीएची परवानगी घेण्यात येत. असून येथे व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षणाला सुद्धा सुरवात होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy Final मध्ये मोठा राडा! जम्मू-काश्मीरचा कर्णधार कर्नाटकच्या फिल्डरला भिडला, मग मयंक अगरवालही...

३० हजारांची लाच घेतली अन् फसला, उपसंचालकाकडे ४ कोटींची रोकड, कोट्यवधींचं सोन् आणि अनेक ठिकाणी फ्लॅट; ट्रॉली बॅगेत पैसे

Sensitive Teeth Tips: दात संवेदनशील आहेत? गरम किंवा थंड खाल्ल्यावर झिणझिण्या येतात? हे 3 टिप्स आजच फॉलो करा

Mumbai News: मुंबईतील राणीच्या बागेत गुजरातच्या सिंहाची गर्जना होणार; कधी? महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur cooperative elections : गोकुळ दूध संघासह कोल्हापूर जिल्ह्यातील ५१६ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार

SCROLL FOR NEXT