Nagpur Weather Update  Sakal
नागपूर

Nagpur Weather Update : विदर्भात उन्हाची तीव्र लाट, नागपूर @ ४१.९

नवतपाच्या पार्श्वभूमीवर आलेली ही भयंकर लाट ‘ये तो सिर्फ झाकी हैं, असली पिक्चर बाकी हैं’ असेच जणू खुणावत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : यंदाचा नवतपा वैदर्भींसाठी किती तापदायक राहणार आहे, याचा ट्रेलर गुरुवारी पाहायला व अनुभवायला मिळाला. आज अचानक उन्हाचा भडका उडून उष्णलाटेने अख्ख्या विदर्भालाच कवेत घेतले. यंदा प्रथमच अकराही जिल्ह्यांचा पारा चाळिशीपार गेला. नवतपाच्या पार्श्वभूमीवर आलेली ही भयंकर लाट ‘ये तो सिर्फ झाकी हैं, असली पिक्चर बाकी हैं’ असेच जणू खुणावत आहे.

कडक उन्हासाठी प्रसिद्ध असलेला मे महिना आता आपला खरा रंग दाखवू लागला आहे. हवामान विभागाने आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला होता. मात्र या इशाऱ्यालाही न जुमानता सूर्यदेव चांगलाच तापला.

उन्हाचा सर्वाधिक त्रास सध्या अकोलेकरांना होत आहे. येथे जवळपास आठवडाभरापासूनच विदर्भात उच्चांकी तापमान आहे. गुरुवारीही पाऱ्याने एका अंशाची उसळी घेत कमाल तापमान या उन्हाळ्यात प्रथमच ४५.५ अंशांवर गेले. बहुतांश जिल्ह्यांमधील कमाल तापमानात एक ते दोन अंशांची वाढ झाली आहे.

नागपुरातही उन्हाचे जोरदार चटके बसले. गुरुवारी येथे ४१.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. याशिवाय अमरावती (४३.२), ब्रम्हपुरी (४३.२), वर्धा (४३.२), यवतमाळ (४३.५), गडचिरोली (४२.६) आणि चंद्रपूर (४३.२) येथेही उन्हाचा कहर दिसून आला.

शरीरातून अक्षरशः घामाचे लोट वाहात आहेत. सायंकाळपर्यंत उन्हाच्या झळा कायम होत्या. येत्या शनिवारपासून नवतपा सुरू होत असल्याने उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. त्याचवेळी यलो अलर्टमुळे काही जिल्ह्यांमध्ये सायंकाळच्या सुमारास वादळी पाऊसही अपेक्षित आहे.

विदर्भातील तापमान

शहर - तापमान

  • नागपूर -४१.९

  • अमरावती -४३.२

  • भंडारा -४०.२

  • वर्धा -४३.२

  • अकोला -४५.५

  • बुलडाणा -४०.५

  • यवतमाळ -४३.५

  • गोंदिया -४०.४

  • ब्रह्पुरी -४३.२

  • वाशीम -४२.०

  • चंद्रपूर -४३.२

  • गडचिरोली -४२.६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT