via Video Conferencing How did the meeting go awry? 
नागपूर

व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्थायी समिती बैठकीचा कसा उडाला बोजवारा ? वाचा

राजेश प्रायकर

नागपूर : महापालिकेत पहिल्यांदाच व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ना अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांचे ऐकले, ना पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांचे ऐकता आले. राज्य शासनाने व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीसंबंधी आठ दिवसांपूर्वी आदेश काढूनही ई-गव्हर्नन्स विभागाने तयारी केली नसल्याने स्थायी समितीच्या बैठकीचा बोजवारा उडाला. त्यामुळे स्थायी सिमती अध्यक्ष पिंटू झलके यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. 


कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रणाचा उपाय म्हणून राज्य शासनाने महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्याचे आदेश काढले. त्यानुसार काल, सोमवारी महापालिकेत स्थायी समितीची बैठक व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेत प्रयोग करण्यात आला. व्हीडीओ कॉन्फरन्स पहिल्यांदा होत असल्याने समितीचे अध्यक्ष व अधिकारी स्थायी समिती कक्षात उपस्थित होते तर इतर सदस्यांनी फोनवरून बैठकीला उपस्थिती लावली.

या बैठकीत मात्र सदस्यांचे आवाज अधिकारी तसेच स्थायी समिती अध्यक्षांनाही ऐकायला येत नव्हते. त्यामुळे त्यांना स्थायी समितीच्या बैठकीत आलेला सल्लागार नियुक्तीच्या प्रस्तावावर चर्चाही करता आली नाही. अखेर स्थायी समिती अध्यक्षांनी सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव प्रशासनाला परत पाठविला. बैठकीत अनेक वेळ आवाज येत नसल्याने त्यात दुरुस्तीत गेला.

परंतु ई-गव्हर्नन्स विभागाच्या अधिकाऱ्यांना यातील तांत्रिक त्रुटी दूर करता आले नाही. व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पहिल्याच बैठकीच्या दृष्टीने प्रशासनाची तयारी नसल्याबाबत झलके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवाय इतर समिती तसेच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली. राज्य शासनाचे आदेश असल्याने ते पाळणे बंधनकारक आहे. त्यामुळे प्रशासनाने तांत्रिक बाबी मजबूत करायला हव्या, असे झलके म्हणाले.

यावेळी प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांना व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकासाठी प्रशिक्षण देण्याचे निर्देश झलके यांनी दिले. सर्वसाधारण सभेत ड्रेनेज लाईनचे प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे. परंतु व्हीडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये अशाच तांत्रिक त्रुटी राहील्या, तर सभा कशी होणार? असा सवाल करीत ड्रेनेज लाईनचे प्रस्ताव रखडण्याची शक्‍यता त्यांनी व्यक्त केली. 
 
अधिकारी अनुपस्थित, नोटीस बजावले 
स्थायी समितीच्या बैठकीत रस्त्यांवरील खड्ड्यावरही चर्चा झाली. मात्र, संपूर्ण शहरात खड्डे असून यावर चर्चेसाठी अनेक अधिकारी अनुपस्थित होते. या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश झलके यांनी दिले. शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 
 
जीएसटी अनुदानात कपातीने वाढविली चिंता 
महापालिकेला कोरोनापूर्वीच्या काळात 93.50 कोटींचे जीएसटी अनुदान मिळत होते. मात्र, मार्चपासून कोरोनाने थैमान घातल्याने राज्य सरकारने जीएसटी अनुदानात कपात केली. मार्चपासून 53 कोटींचे अनुदान मिळत आहे. मे व जूनचे केवळ 100 कोटी रुपये अनुदान मिळाले. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षांनी चिंता व्यक्त केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Hike India : मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा फटका ! देशात LPG सिलिंडर दरात वाढ, जाणून घ्या आजचे ताजे दर

Sports News: अपयशी कर्णधाराचा शिक्का लागला असता; राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागचे मत

Pimpri Education News: डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक संशोधनावर चर्चासत्र

Akola News:क्रीडा शिष्यवृत्तीतही बॉक्सरांचाच दबदबा; जिल्ह्यातील ४३ खेळाडूंपैकी तब्बल २१ बॉक्सरांची निवड

Satara Politics:साताऱ्याच राजकारण तापणार! भाजप,राष्ट्रवादी-शिवसेना पुन्हा आमने-सामने; जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीकडे लक्ष..

SCROLL FOR NEXT