Vijay Vadettiwar said follow the rules otherwise lockout again 
नागपूर

विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘नियमांचे पालन करा, अन्यथा पुन्हा टाळेबंदी’; नाईट कर्फ्यू लावण्याचा सरकारचा विचार

राजेश रामपूरकर

नागपूर : नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास लवकरच सायंकाळी सहा वाजल्यापासून ते सकाळी नऊ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ शकते, असे संकेत मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना येथे दिले.

कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्यासंदर्भात सरकार वारंवार आवाहन करीत आहे. मात्र, असे असतानाही काही लोकांनी हे नियम पार धाब्यावर बसवले आहेत. यामुळे आता राज्य सरकार पुन्हा नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार करीत आहे. मास्कचा वापर करणे, गर्दी टाळणे आदी गोष्टी नागरिकांनी पाळायला हव्यात, असेही ते म्हणाले.

कोरोनाच्या लक्षणांमध्ये काही बदल झाले आहेत. मात्र, वारंवार सांगूनही लोक विनामास्क फिरत आहेत. यामुळे आता काही कठोर पावले उचलावी लागणार आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कर्फ्यू लावण्यासंदर्भात अधिकार देण्यात आले आहेत. संबंधित जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या कोरोनाचा प्रसार आणि तेथील गर्दी, लक्षात घेऊन नाईट कर्फ्यूसंदर्भात जिल्हाधिकारी निर्णय घेतील असेही वडेट्टीवार म्हणाले.

मंगल कार्यालयांवर कारवाई

मास्कचा वापर करणे, अंतर राखणे, गर्दी टाळणे या गोष्टी नागरिकांनी पाळायला हव्यात. लग्न समारंभातील गर्दी टाळण्यासाठी आता आम्ही मंगल कार्यालयांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अरविंद केजरीवालांसह कुटुंबातील ५ जणांना निवडणूक आयोगाकडून नोटीस, कारण काय?

iPhone युजर्ससाठी WhatsAppचे खास गिफ्ट; मेसेज अन् चॅनेल अपडेट्स शोधणे होणार सोपे! पाहा नवे 'सर्च' फीचर...

Nagpur Crime: नागपुरात मकोका आरोपीचा रुग्णालयातून पलायन; मेडिकल कॉलेजच्या शौचालयाची खिडकी तोडून फरार

Latest Marathi News Update : IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर संताप; मुख्य गेटबाहेर दिवे लावून आंदोलन

Gangapur Crime: गंगापुरात वृद्ध शेतकऱ्याची दीड लाखांची रोख रक्कम लंपास; बँकेसमोरून हेल्मेटधारी चोरट्यांचा थरार

SCROLL FOR NEXT