vijay wadettiwar name discussion for maharashtra congress president  
नागपूर

'महाराष्ट्राच्या काँग्रेस नेतृत्वासाठी माझ्या नावाची चर्चा'

संजय डाफ

नागपूर : मी राज्यात ज्या पद्धतीनं काम करतो त्यामुळे ओबीसींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तसेच माझ्याकडे महाराष्ट्राचे नेतृत्व देण्याच्या चर्चा होत आहेत. मात्र, तो निर्णय हायकमांडचा आहे. पण, मी तिथपर्यंत जाऊ नये, यासाठी विरोधक बदनामी करत आहेत. सुतळीचा साप करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत, असा आरोप राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. आज नागपुरात पोसपोर्ट प्रकरणाविषयी बोलताना राज्याचे नेतृत्वाबाबतही त्यांनी हे वक्तव्य केले.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी  ४ जानेवारीला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न निर्माण झाला. यामध्ये नाना पटोले, सुनिल केदार यांच्या नावाच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, अजूनही दिल्ली हायकमांडने निर्णय दिलेला नाही. नाना पटोले हे देखील प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक असल्याचे बोलले जाते. तसेच यंदा नॉन मराठा नेत्याला प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपविली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यातच आता वडेट्टीवार म्हणाले, की राज्याचे नेतृत्व माझ्याकडे येण्याबाबत चर्चा आहे. त्यामुळे आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद कोणाकडे जाते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

संंपादन - भाग्यश्री राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT