gobar 
नागपूर

"शेण खाल्याने कोरोना होत नाही..!', काय आहे या व्हायरल मेसेजमागील तत्थ्य?

सकाळवृत्तसेवा

नागपूर : सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचे गंभीर संकट घोंघावत आहे. अशात सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जनजागृतीपर मेसेज फिरत आहेत. यासोबतच काही दिशाभूल करणारे मेसेज देखील हेतुपुरस्सररित्या पाठवण्यात येत असल्याचे पुढे आले आहे.

अनेकदा समाजाची श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोब बाबतीत गफलत होताना पाहायला मिळते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता काही समाज कंटकांनी आपला हेतू यातूनसुद्धा साध्य करण्याचे काम सुरू केले आहे. गोमूत्र, लवंग आणि शेण खाल्याने कोरोना होत नाही, असा अजब आणि हास्यास्पद दावा ही मंडळी करत असल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी "दै. सकाळ'शी बोलताना सांगितले. 

हे भोंदू लोकांचा भोळेपणाचा आणि अशिक्षितपणाचा फायदा घेत असे हास्यास्पद विधाने करतात. अमुक-अमुक मंत्र म्हटल्यास तुम्हाला कोरोना होणार नाही, कोरोनाला दूर ठेवण्याच्या दृष्टीने आमच्या कडील तेल विकत घ्या, अग्निहोत्र करीत होम करा, लवंग जाळा अशा थोतांड बाबी कोरोनाने भयभीत नागरिकांना सांगत अंधश्रद्धा पसरवित आहेत. मात्र, त्यांचा हा दावा ते आजवर सिद्ध करू शकले नाही. यासाठी अनेक नागरिक एकत्रित येत यज्ञ करीत आहेत. मुळात, कोरोनापासून बचावासाठी नागरिकांनी समुहाने एकत्रितही यायला नको, असेही देशमुख म्हणाले.

अफवांपासून दूर रहा 
खबरदारीचे उपाय म्हणून प्रशासनाने ज्या ज्या उपाययोजना केल्या आहेत त्याला नागरिकांनी सहकार्य करावे. कोरोना आजार झालेल्यांसह त्यांच्या परिवाराला बहिष्कृत करु नये. कायद्यानुसार अशा लोकांवर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. आपण या संकटाचा एकजुटीने सामना करायला हवा. नागरिकांनी अफवा आणि अंधश्रद्धेचा बळी पडू नये. 
- मिलिंद देशमुख, राज्य प्रधान सचिव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO: सिडको थकबाकीदार! नवी मुंबई पालिकेकडून मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू

Shiroli MIDC : शिरोली एमआयडीसीत ऑईल दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाची धावपळ

Numerology : 'या' 2 मूलांकाच्या लोकांना कधीच सांगू नका तुमचे सिक्रेट; सरड्यासारखे रंग बदलून जगापुढे करतात तुमची नाचक्की

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या आदिवासी आयुक्तालय बाहेर आदिवासी विद्यार्थ्याचा ठिय्या

Kolhapur City Boundary Expansion : कोल्हापूर शहराची हद्दवाढ २०२७ पर्यंत होणार नाही, खरं कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT