beggar e sakal
नागपूर

नागपूरचा भिकारी बोलतोय फाडफाड इंग्रजी, पाहा व्हिडिओ

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : शहरात फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या भिकाऱ्याची जोरदार (viral video of beggar) चर्चा आहे. हा भिकारी डोक्यावर बॉटल ठेऊन उलटा चालतो, फाडफाड इंग्रजी बोलतो आणि भर रस्त्यात एका पायावर उभा राहून योगाही करतो. नागपूर शहरात या अनोख्या भिकाऱ्याची सध्या जोरात चर्चा आहे. रस्त्यावर ये-जा करणारे लोक क्षणभर थांबतात आणि या उलटा चालणाऱ्या आणि फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या भिकाऱ्याकडे बघतात. हा व्हायरल भिकारी सध्या नागपूरकरांच्या कुतुहलाचा विषय ठरतोय.

भिकाऱ्याने फाटलेली टीशर्ट आणि निळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. डोक्यावर बाटली, त्यावर ग्लास आणि उलटा चालत हा नागपुरातील रस्त्यावर फिरतोय. राहुल प्रभुदा पेटकर, असं या भिकाऱ्याचं नाव आहे. वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यांवर सरळ चालताना अपघाताची किंवा कुणी येऊन धडकण्याची भिती असते, तिथे हा भिकारी निडर होऊन आणि तेवढ्याच वेगानं उलटा चालतो. जेवढ्या वेगानं हा भिकारी उलटा चालतो, तेवढीच फाडफाड तो इंग्रजीही बोलतो.

उलटा चालत असल्याने हा भिकारी नागपुरात सध्या वेगानं व्हायरल होतोय. यासोबतच तो भररस्त्यात योगा करतो. उलटं चालणे ही स्मरणशक्ती वाढविण्यासाठी बेस्ट प्रॅक्टीस असल्याचं हा भिकारी सांगतो. “रहने को घर नाही, सोने को बिस्तर नही, अपना खुदा है उपरवाला अबतक उसीने पाला” असं म्हणत 5 रुपये मागून हा भिकारी दोन वेळच्या जेवणाची सोय करतो. उलटा चालण्याचा प्रवास जिथे संपला तिथेच मुक्काम, आणि दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणहून त्याचा उलटं चालण्याचा प्रवास सुरु होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ''तुम्ही बंजारा समाजासारखे दिसत नसतानाही आरक्षण का खाल्लं?'', धनंजय मुंडेंना उद्देशून जरांगेंचं मोठं विधान

अडीच वर्षांपूर्वी विवाह, पतीसह सासरच्यांकडून छळ; पोलिसाच्या पत्नीनं तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन, दिरानं रुग्णालयात नेलं, पण...

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

Crop Loss: पिकेच झाली उद्‍ध्वस्त, खत देणार कशाला? नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ७० हजार टनांहून अधिक साठा पडून

Layoff 2025: अमेरिकन कंपनीचा धक्कादायक निर्णय; 4 मिनिटांच्या कॉलमध्येच भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं

SCROLL FOR NEXT