Visit to Hanuman Temple at Nand in Nagpur District 
नागपूर

चला, दीडशेपेक्षा अधिक वर्षांची परंपरा लाभलेल्या हनुमंतांच्या दर्शनाला; भाविकांचा भरला मेळा

गोकुल वैरागडे

नांद (जि. नागपूर) : नांदपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या भिवापूर तालुक्यातील मुचेपार येथे दर शनिवारी व सोमवारी यात्रा भरते. मागील दीडशेपेक्षा अधिक वर्षांची हनुमान मंदिरातील या यात्रेला परंपरा आहे. यात्रेला भाविकांचा मोठ्या प्रमाणात मेळा लागतो. ही यात्रा सद्या सुरू झाली असून, परिसरात धार्मिक वातावरण आहे.

येथे विदर्भासह परराज्यातील भाविकही हनुमंतांच्या दर्शनासाठी येत असतात. बोटेझरीच्या घनदाट जंगलातील टेकडीवर हनुमानाची स्वयंभू मूर्ती आहे. देवस्थानाचा इतिहास हा प्राचिन असून, येथील हनुमानाची मूर्ती जागृत असल्याचे मानले जाते. समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रात एकूण ११ मारूतींच्या देवस्थानची स्थापना केली. त्यावेळचे हे देवस्थान असल्याचा दाखला परिसरातील व बोटेझरी येथील प्रौढ गावकरी देतात.

दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येथे हनुमानाची यात्रा भरते. मराठी पंचांगानुसार मार्गशीर्ष महिना सुरू झाला की दर शनिवारी व सोमवारी यात्रा भरण्यास सुरुवात होते. भाविकांची दर्शनासाठी मोठी रिघ लागलेली असते. या देवस्थानातील हनुमान नवसाला पावणारा मारूती असल्याचे परिसरातील अनेक नागरिक सांगतात. त्यामुळे लहानांपासून तर मोठ्यापर्यंत‌ नवस फेडण्याची प्रथा पाडतात.

ज्याच्या नावाने हा नवस फेडला जातो, त्याचे जेवढे वजन असेल तेवढ्याच वजनाने गूळ, साखर व पेढ्यांची तुला केली जाते. पूर्वी या यात्रेला परिसरातील नागरिक स्वयंपाकास बैलबंड्यांनी यायचे. दुरून येणारे नागरिक चारचाकी वाहनांनी यायचे. बैलगाड्या घेऊन भाविक कुटुंबासह स्वयंपाकास येत होते. आजही ती परंपरा कायम आहे. फक्त बैलगाड्याच्या जागी चारचाकी वाहनांनी घेतली आहे.

मार्गशीर्ष महिन्यातील यात्रा ही सव्वा महिना चालत असते. हनुमान देवस्थानातील पंचकमिटी यांनी कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराचे भान ठेवून व नियम पाळून आहेत. या यात्रेसाठी येताना भाविकांना तोंडाला मास्क लावूनच यावे, अशा सूचना देवस्थान पंचकमिटीने दिली आहे. या यात्रेत दररोज काकडा आरती, भजने, रामधुन, गीता, भागवत पुराण आदी पारायणे केली जातात. गोपालकाला व महाप्रसादाने यात्रेचा समारोप होतो.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Women Cricketers Salary: नववर्षाआधी ‘BCCI’कडून महिला खेळाडूंना मोठी भेट; वेतनात केली दुप्पट वाढ

BJP Candidate List : भाजप उमेदवारांच्या यादीला शुक्रवारचा मुहूर्त; शिवसेनेसोबत जागावाटप अजूनही अनिश्चित!

धक्कादायक! पहिल्या पतीला सोडून २८ वर्षीय विवाहिता ४४ वर्षांच्या दुसऱ्यासोबत राहिली, त्याने दारुच्या नशेत केला तीन वर्षांच्या चिमुकल्याचा खून, नातेवाईकांच्या संशयानंतर उलगडली कहाणी

Silent Call Scam Alert : फोन वाजतो, पण आवाजच नाही? सावध राहा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं!

Bandu Andekar Arrest : जमिनीवर बेकायदा ताबा घेऊन ५.४० कोटींची खंडणी; आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर अटकेत!

SCROLL FOR NEXT