voter id sakal
नागपूर

मतदार ओळखपत्र आता मिळणार घरपोच; श्रीकांत देशपांडे यांची ग्वाही

नवमतदारांचे ओळखपत्र ‘स्पीड पोस्ट’ ने घरपोच पाठवले जाणार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मतदार यादीत नाव नोंदविल्यानंतरही ओळखपत्र मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी नवमतदारांचे ओळखपत्र ‘स्पीड पोस्ट’ ने घरपोच पाठवले जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी विदर्भातील दोन्ही विभागाच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, नवतरुण मोठ्या प्रमाणावर निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर आहेत. त्यांना सहभागी करून घेण्यासाठी मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे १ ते ३० नोव्हेंबर दरम्यान विशेष जागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यात महाविद्यालये, उद्योग, विविध संस्थांच्या ठिकाणी शिबिरे आयोजित केली जातील.

१३ व १४ तसेच २७ व २८ नोव्हेंबर रोजी वंचित घटक, दिव्यांग कामगार यांच्या मतदार म्हणून नाव नोंदणीसाठी विशेष शिबिरे आयोजित केली जातील. येत्या १६ नोव्हेंबर रोजी विशेष ग्राम सभा होतील. यात गावातील तरुण मतदारांची नोंदणी तसेच लग्न होऊन गावात येणारी नवविवाहितेची नोंदणी केली जाईल. कुणी लग्न होऊन गावाबाहेर गेली असेल तर त्यांचे नाव कमी केली जाईल.

राज्यात एकाच व्यक्तीचे दोन व त्यापेक्षा अधिक ठिकाणी मतदार यादीत असल्याची संख्या पाच लाखांवर होती. मतदार यादी अद्ययावत कार्यक्रमांतर्गत अशा लोकांचा शोध घेण्यात आला. अशा लोकांची संख्या आता केवळ १३ हजारापर्यंत राहिली आहे. अजूनही ते काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तृतीयपंथींच्या जन्माचा दाखल्याचा मोठा प्रश्न असते. त्यांनी स्वतः सत्यप्रत किंवा त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांकडून हमीपत्र दिल्यास नोंदणी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

ऑनलाइन मतदानाचा प्रयोग

ऑनलाइन मतदान प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न आहे. परंतु, सध्या असा कुठलाही प्रस्ताव नाही. मी स्वतः यासंदर्भात एनआयसीसोबत चर्चा केली. ही संकल्पना चांगली असली तरी अगोदर त्याचा पूर्ण अभ्यास करावा लागेल. प्रायोगिक तत्‍त्वावर ही संकल्पना राबवावी लागेल. त्यातील त्रुटीचा अभ्यास करून नंतर निर्णय घ्यावा लागेल, असे देशपांडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thar Accident सोमवारी पुण्याहून कोकणात जायला निघाले, गुरुवारी ताम्हिणी घाटातल्या दरीत थारसह ६ मृतदेह दिसले; कधी आणि काय घडलं?

भारतीय जवानाचं शिरच्छेद करून मुशर्रफसमोर ठेवलं, काय आहे किस्सा? ‘धुरंदर’मध्ये अर्जुन रामपाल साकारणार त्या राक्षसाचा चेहरा

Chief Minister Security : कोणत्या मुख्यमंत्र्यांना आहे जबरदस्त सुरक्षा कवच अन् जाणून घ्या, नितीश कुमारांची सुरक्षा कशी?

Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात मोटार खोल दरीत कोसळली, चार मृतदेह हाती; मृतांची नावे समोर, सर्वजण पुण्यातील

Latest Marathi News Update LIVE : अमरावतीत काँग्रेसची आढावा बैठक; तीनही नगरपरिषद जिंकण्याचा कार्यकर्त्यांचा निश्चय

SCROLL FOR NEXT