wadettiwar spoke truth about rahul gandhi India alliance should think election vote chandrasekhar bawankule Sakal
नागपूर

Chandrasekhar Bawankule : राहुल गांधींबाबत वडेट्टीवार खरे बोलले; २८ पक्षांच्या इंडिया आघाडीने विचार करावा - चंद्रशेखर बावनकुळे

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत, यातच भारताचे व राष्ट्राचे कल्याण आहे ; बावनकुळे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जो वक्ता नाही तो नेता कसा बनू शकेल, असे जाहीर विधान करणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार अनावधानाने का होईना खरे बोलले आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात निवडणुका लढायच्या की नाही हे इंडिया आघाडीने ठरवावे, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना दिला.

नागपूर येथे ते माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, वडेट्टीवार यांना अशी शंका असेल तर त्यांच्या मनात काय सुरू आहे, याचा अर्थ काढावा. २८ पक्षांच्या इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांनीसुद्धा याचा विचार करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर, सर्वोत्तम भारताच्या संकल्पाला पुढे नेण्यासाठी काम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार देशहिताच्या विचाराने भाजपासोबत आले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत, यातच भारताचे व राष्ट्राचे कल्याण आहे, असे सर्वांचे मत झाले आहे.

पक्ष आणि चिन्ह हा वाद यात नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील वादावार बोलताना ते म्हणाले की, निवडणुकीत लोकांमधून विजयी झालेले आमदार-खासदार ज्या बाजूने असेल त्यांचा तो पक्ष असेल, असे माझे मत असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा निर्णय अखेर निवडणूक आयोगाला घ्यायाचा आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT