नागपूर

साहेब दिवाळी आहे, पैसे आले का जी?

ज्यांचा कोणी आधार नाही, अशा निराधारांचा उदरनिर्वाह शासनाच्या मानधनावर चालतो

मनोज खुटाटे

जलालखेडा : ज्यांचा कोणी आधार नाही, अशा निराधारांचा उदरनिर्वाह शासनाच्या मानधनावर चालतो. ते बिचारे मागील काही दिवसांपासून बँकेच्या चकरा मारीत आहेत. बँकेत जाऊन साहेब दिवाळी आहे, आमचे पैसे आले का, अशी विचारणा वृद्ध, निराधार करीत होते, पण दिवाळी गेली, पण त्यांचे मानधन आले नाही.

ज्यांच्या ओठातून पूर्ण क्षमतेने शब्द बाहेर पडत नाहीत, चालणेच काय ज्यांना धड उभेसुद्धा राहता येत नाही, शरीरात बळ नाही. थांबण्याची क्षमता नाही, अशा निराधार आणि ज्येष्ठ नागरिकांची अलीकडे बँकेत गर्दी होत होती. जेणेकरून त्यांचे मानधन येईल व दिवाळी साजरी करता येईल. चेहऱ्यावर सुरकुत्या अन् चिंतेचे सावट केविलवाण्या शब्दात विचारणा करतात, साहेब आमचे पैसे आलेत काय जी? अनुदान पाठविल्याचे आम्ही ऐकले आहे. दिवाळीचा सण साजरा झाला, पण निराधारांची दिवाळी अंधारातच गेली.

तसे तर ते अर्धवट निराधार सरकारी शिक्का लागल्याने ते पूर्णतः निराधाराच्या श्रेणीत आले. गेल्या चार महिन्यांचे विविध सरकारी योजनांचे अनुदान थकले आहे. निराधारांना दिवाळीपूर्वी आधार देण्याचे निर्देश शासनाचे आहेत. त्यामुळे निराधारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण अद्यापही त्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने त्यांच्या दिवाळी सणावर आर्थिक संकटाचे सावट पसरले होते.

कुटुंबाचा आधार गेला.... आयुष्यात अंधार पसरला. जगण्याचे सर्व मार्ग बंद झाले. कुटुंबाला जगविण्याचा प्रश्न उभा झाला. तेव्हा निराधारांचा आधार म्हणून संजय निराधार योजना ठामपणे उभी राहिली. निराधारांना जगण्याचे बळ मिळाले. मुलांच्या शिक्षणासाठी आधारवड ठरला. मात्र, आज अनेकांच्या आयुष्यात अंधार पसरेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. दिवाळीही अंधारात जाईल, अशी भीती त्यांना वाटते आहे. कारण मागील ४ महिन्यांपासून संजय निराधार योजनेचे मानधन थकले आहे. परंतु पालकमंत्री नितीन राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन निराधारांना दिवाळीपूर्वी मानधन पोहोचेल, अशी व्यवस्था करावी, असे निर्देश दिले. त्यामुळे निराधारांनी बँकेत एकच गर्दी केली आहे. पण त्यांच्या खात्यात पैसे मात्र जमा झाले नाही.

निराधारांचा एकमेव आधार म्हणजे संजय गांधी निराधार योजना या योजनेंतर्गत असलेल्या विविध योजना आहे. यात नरखेड तालुक्यातील हजारो लाभार्थी आहेत. या योजनेअंतर्गत प्रतिमाह एक हजार रुपये मानधन मिळते. गेल्या चार महिन्यांपासून या योजनेचे अनुदान थकले. मे नंतर अनुदानाचे वाटप झालेच नाही. इतरांप्रमाणे त्यांनाही दिवाळी साजरी करायची आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी अनुदान मिळावे अशी अपेक्षा त्यांना आहे. मुले असूनही काहीना निराधाराचे जीवन जगावे लागते. त्यांचा आधार हिरावला असला तरी संजय गांधी निराधार योजना त्यांचा आधार बनली आहे. नियमित अनुदान मिळावे, एवढीच त्यांची अपेक्षा आहे. तांत्रिक कारणामुळे विलंब झाला तरी अनुदान मात्र मिळते, हेही तेवढेच सत्य आहे. योजनेचा लाभ गरजूंना मिळावा योजनेत पारदर्शकता असावी, यासाठी सारी प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली. सर्व लाभार्थ्यांना आता बँकेतूनच अनुदान मिळते.

निराधार योजना समितीची अद्याप स्थापना नाही

विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पालकमंत्री व स्थानिक आमदार संजय गांधी निराधार योजना समिती गठीत करतात. यात अध्यक्ष नियुक्त केल्या जातो. पण विधानसभा निवडणूक होऊन दोन वर्ष लोटली, तरी समिती मात्र स्थापन करण्यात आली नाही, हे विशेष.

"संजय गांधी निराधार योजेंतर्गत असलेल्या सर्व लाभार्थ्यांचे पैसे बँकांना पाठविण्यात आले आहे. पैसे त्वरित त्यांच्या खात्यात जमा करून त्यांना वाटप करण्यात यावे, जेणेकरून त्यांना दिवाळी साजरी करता येईल, अशा सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत."

-डी.जी.जाधव, तहसीलदार, नरखेड

"निराधारांचे पैसे अजूनही त्यांच्या खात्यात जमा झाले नाही. त्यांच्या खात्यात neft द्वारे निधी जमा केला जातो. पण अद्याप तरी त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याने त्यांना पैसे देता येणार नाही."

-मनीष गजभिये, बँक व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, शाखा भारसिंगी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT