राज संतोष कावरे (१८) मृताचे तर प्रतिक ऊर्फ गोलू पटेल (२०) असे जखमीचे नाव आहे. घटनेशी संबंधित सर्वच श्रमिकनगर, परसोडी येथील रहिवासी आहेत. यामुळे एकमेकांचे परिचितही आहेत.  
नागपूर

नागपुरात हाणामारी आणि खुनाचा भयंकर थरार! दारूच्या कारणावरून दोन गटांमध्ये सशस्‍त्र संघर्ष; एकाचा खून

योगेश बरवड

नागपूर ः दारूच्या कारणावरून दोन गटात संघर्षाची ठिणगी पडली. एकमेकांवर सशस्‍त्र हल्ला चढविण्यात आला. यात एक ठार तर तीनजण जखमी झाले. त्यातील एकावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहे. गुरुवारी रात्री बेलतरोडी हद्दीतील परसोडी भागात ही थरारक घटना घडली. या प्रकरणात दोन्ही गटातील दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

राज संतोष कावरे (१८) मृताचे तर प्रतिक ऊर्फ गोलू पटेल (२०) असे जखमीचे नाव आहे. घटनेशी संबंधित सर्वच श्रमिकनगर, परसोडी येथील रहिवासी आहेत. यामुळे एकमेकांचे परिचितही आहेत. पण, त्यांच्यात दोन गट तयार झाले आहेत. रामस्वदीप ऊर्फ लाला रामविलोचन पटेल (२४) हा पोलिसांना माहिती देत असल्याचा बोरगे गटाला संशय होता. 

गुरूवारी रात्री ८ च्या सुमारास लाला हा त्याचे मित्र प्रतिक उर्फ गोलू आणि मृतक राज यांच्यासह दुचाकीने तिबलसिट जात होता. त्याच वेळी आरोपी अजय बोरगे, सचिन बोरगे, अमित बोरगे, रजत बागडे यांनी लालाची मोटारसायकल थांबविली आणि त्याला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. लालाने नकार दिल्याने आरोपी भडकले. लाकडी दंडा व चाकूने प्रतिकच्या कंबरेवर, खांद्यावर आणि राजच्या हातावर, पाठीवर, काखेखाली वार करून जखमी केले. घटनेनंतर आरोपी पळून गेले.

अगदी काही क्षणातच घटनेची माहिती लालाच्या साथीदारांपर्यंत पोहोचली. यामुळे तेही संतापले. अजय बोरगे हा आपल्या घरासमोर उभा असताना लाला पटेल याने त्याला फोन करून ‘तू कुठे आहेस’ अशी विचारणा केली. त्यानंतर गोलू पटेल, राज कावरे, लंकेश उर्फ अंकुश पटेल, शुभम पटेल, डीके ऊर्फ रक्षक खोब्रागडे, पीयुष शुक्ला, अक्षय मडावी, सुभाष शाहू हे त्याच्या घरासमोर पोहोचले. त्यांनी अजयचा भाऊ सचिन बोरगे, चुलतभाऊ अमित बोरगे यांच्यावर तलवार, चाकू आणि लाकडी दंड्याने हल्ला चढविला. या हल्ल्यात सचिन आणि अमित दोघेही जखमी झाले.

दरम्यान, जखमी प्रतिक पटेल, राज कावरे यांना मेडिकलमध्ये भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी ६ च्या सुमारास राजचा मृत्यू झाला. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी दोन्ही घटांकडून मिळालेल्या तक्रारीच्या आधारे बोरगे गटावर खुनाचा तर पटेल गटावर दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी बोरगे गटातील सचिन, अमित आणि पटेल गटातील लाला पटेल, लंकेश पटेल, शुभम पटेल, रक्षक खोब्रागडे, पीयुष शुक्ला, अक्षय मडावी, सुभाष शाहू यांना अटक केली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावण निर्माण झाले आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT