warning of strike with all mla nitin Gadkari over Uppalwadi issue nagpur politics  sakal
नागपूर

Nagpur : ...तर सर्व आमदारांना घेऊन स्वत: मोर्चा काढणार; उप्पलवाडीच्या प्रश्नावरून गडकरी अधिकाऱ्यांवर संतापले

Nagpur Latest News | रस्ते, पाणी, वीज अशा अनेक गंभीर समस्या उप्पलवाडीत असून नागरिक नरकयातना भोगत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : रस्ते, पाणी, वीज अशा अनेक गंभीर समस्या उप्पलवाडीत असून नागरिक नरकयातना भोगत आहेत. निवडणुकीत प्रचारावेळी याचा चांगला अनुभव आला. या समस्या तत्काळ निकाली न निघाल्यास सर्व आमदारांना घेऊन स्वतः मोर्चा काढेल, अशा कडक शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फटकारले.

यावर विस्तृत डीपीआर लवकर सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम रविवारी मनपा मुख्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला.

यावेळी माजी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल व अजय चारठाणकर, यांची उपस्थिती होती.

याशिवाय मनपाच्या सर्व झोनचे अधिकारीही उपस्थित होते. शहरातील विविध भागातील नागरिक अडचणी घेऊन आले. विधानसभानिहाय नागरिकांची निवेदने स्वीकारण्यात आली. इतकेच नाही तर दिल्ली, उत्तराखंड, बिहार, मध्यप्रदेशमधून व महाराष्ट्रातील नांदेड, वर्धा, यवतमाळ, गोंदिया आदी जिल्ह्यातील नागरिकसुद्धा समस्या घेऊन आले होते.

सकाळपासूनच प्रचंड गर्दी झाली होती. यात दिव्यांग, महिला, ज्येष्ठ नागरिक सहभागी होते. त्यावरून नागरिकांच्या तक्रारी प्रशासनस्तरावर सुटत नसल्याचे वास्तव समोर आले. गडकरी यांनी उप्पलवाडीच्या प्रश्नाबाबत योग्य डिझाईन तयार करण्याचे निर्देश दिले. अर्धवट कामे करू नका, योग्य नियोजन करण्याची तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

‘प्रशासक राज’मुळे तक्रारी आणि गर्दी

महापालिकेत सत्ता नसल्याने सर्व कारभार अधिकाऱ्यांच्या ‘प्रशासक राज’नुसार सुरू आहे. नागरिक तक्रारी घेऊन मनपामध्ये जातात मात्र समस्या सुटत नाहीत. त्यामुळे गडकरींच्या जनसंपर्क कार्यक्रमात सर्वात जास्त समस्या या मलवाहिनी चोक होणे,

घरात पाणी शिरणे, रस्ते खराब असणे, रस्त्यावर पाणी तुंबणे, पाणी समस्या आदी बाबत होत्या. जवळपास दीड हजारांवर तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या. मनपा प्रशासनाकडून तक्रारींची दखल घेतल्या जात नसल्याचे गाऱ्हाणे सुद्धा नागरिकांनी मांडले.

आक्रमण युवक संघटनेची नारेबाजी

पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या नसल्यामुळे आणि प्रशासनाने योग्य व्यवस्था केली नसल्यामुळे संतापलेल्या आक्रमण युवक संघटनेच्या वतीने नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमात नारेबाजी केली.

आक्रमण युवक संघटना निवेदन देण्यासाठी आली होती. २० जुलै रोजी नागपुरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातील ईमामवाडा, रामबाग, इंदिरानगर आणि जाटतरोडी या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओपुल तामगाडगे आणि जिल्हा संघटक प्रमुख विशाल बनसोड यांच्या नेतृत्वात स्थानिक जनसंपर्क कार्यक्रमात निवेदन देण्यासाठी पोहोचले. टोकन नंबरची व्यवस्था असतानाही गोंधळ उडाला. त्यामुळे गडकरी यांनी थेट नागरिकांमध्ये जाऊन निवेदन स्वीकारावे लागले. त्यामुळे समस्याग्रस्तांना समस्या मांडता आल्या नाहीत.

कार्यक्रमात नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. स्थानिक प्रशासनाने योग्य व्यवस्था न केल्याचा आरोप करून आक्रमण युवक संघटनेने महापालिकेतच गडकरींच्या जनसंपर्क कार्यक्रमात नारेबाजी रोष व्यक्त केला. यावेळी संघटनेचे सूरज पुराणिक, नागेंद्र पाटील, अश्विन पाटील, दीक्षा चौरे, रामू चाचेरे आदी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT