Ujjwala Gas Sakal
नागपूर

Ujjwala Gas: उज्ज्वला गॅस धारकांची लूट! अनिवार्य तपासणीचं दिलं जातय कारण, काँग्रेस नेत्याचा भाजपवर आरोप

Ujjwala Gas Surplus Charges: उज्ज्वला योजनेच्या कनेक्शनसाठी आता अनिवार्य तपासणीच्या नावाखाली एलपीजी कंपन्या व वितरकांकडून ग्राहकांची प्रचंड लूट केल्या जात असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Washim Ujjwala Gas : ग्रामीण भागातील महिलांची धुरापासून मुक्तता व्हावी व त्यांचे आरोग्य सुदृढ रहावे हा मुद्दा पुढे करत गॅस कंपन्यांना फायदा पोहोचवण्याचा दृष्टीने केंद्रातील भाजप सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. मात्र योजनेच्या कनेक्शनसाठी आता अनिवार्य तपासणीच्या नावाखाली एलपीजी कंपन्या व वितरकांकडून ग्राहकांची प्रचंड लूट केल्या जात असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी केला आहे.


गॅस कनेक्शनची अनिवार्य तपासणीच्या नावाखाली प्रत्येकी २३६ रुपये प्रमाणे शुल्क आकारून ग्राहकांची लूट केल्या जात आहे. सरसकट प्रत्येक ग्राहकांकडून २३६ रुपये वसूल करणे म्हणजे लुटीचा हा नवा फंडा मोदी सरकारने शोधून काढल्याचा आरोप देवानंद पवार यांनी केला आहे.
इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम या कंपन्यांमार्फत वाशीम जिल्ह्यात प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे १ लाख ४ हजार २९७ कनेक्शनचे वाटप केले आहे.

एकट्या वाशीम जिल्हयातून २ कोटी ४६ लाख १४ हजार ९२ रुपये वसूल केल्या जाणार आहे. विशेष म्हणजे तपासणीच्या रक्कमेवरही १८ टक्के जीएसटी लावण्यात आली आहे. अशा प्रकारे लुटल्या जाणाऱ्या रक्कमेमुळे ग्रामीण महिलांना धुरातून मुक्ती मिळण्याऐवजी त्यांचा जीव आता गुदमरत असल्याची टिकाही देवानंद पवार यांनी केली आहे. (Latest Marathi News)

अन्यथा कोर्टात जाऊ
सुरक्षित सेवा देणे हे कंपन्यांचे कर्तव्यच आहे. अनिवार्य तपासणीच्या नावाखाली जबरदस्तीने रक्कम वसूल केल्या जात असेल तर या संदर्भात ग्राहकांनी पुढे येवून जिल्हा पुरवठा विभाग व जिल्हाधिकारी यांच्याकडे रितसर तक्रार करावी. या संदर्भात प्रशासनाने योग्य दखल न घेतल्यास कंपन्या व वितरकांच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरू आणि एवढेही करून हा गोरखधंदा थांबविल्या गेला नाही तर आम्ही कोर्टात जाऊ- देवानंद पवार, वाशीम जिल्हा प्रभारी (काँग्रेस)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT