Omicron variant sakal media
नागपूर

नागपूर : विदेशातून आलेल्या शंभर जणांवर ‘वॉच’

महापालिकेकडून चाचणीसह विलगीकरणावर भर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गेल्या काही दिवसांत शहरात विदेशातून आलेल्या शंभर नागरिकांवर महापालिकेची करडी नजर आहे. त्यांची चाचणी करून त्यांना संस्थात्मक विलगीकरणात पाठविण्याबाबत महापालिकेने प्रक्रिया सुरू केली. नव्या व्हेरियंटचा धोका लक्षात घेता महापालिकेने सर्व व्यवस्था केली आहे.

कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर महापौर दयाशंकर तिवारी यांनी आज महापालिकेच्या तयारीचा आढावा घेतला. या बैठकीत ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, वैद्यकीय अधिकारी गोवर्धन नवखरे यांच्यासह सर्व झोनल आरोग्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी मनपाकडे प्राप्त माहितीनुसार नागपूर शहरात विदेशातून प्रवास करून आलेल्या १०१ प्रवाशांची नोंद असल्याचे सांगितले. या सर्व प्रवाशांची चाचणी करून त्यांचे विलगीकरण करण्यात येत आहे. कोरोनाच्या नव्या ‘ओमिक्रॉन’ या व्हेरियंटच्या धोक्यापासून बचावासाठी नागरिकांनी सजग राहण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. बैठकीत मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी महापालिकेच्या तयारीची माहिती दिली

शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, एम्स, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील रुग्णसंख्या ५० टक्के पर्यंत आल्यास मनपामध्ये आरोग्य कर्मचारी संख्या सुद्धा वाढविण्यात येईल, असेही डॉ. चिलकर यांनी सांगितले. यावेळी डॉ. चिलकर यांनी विदेशातून येणारे प्रवासी तसेच देशांतर्गत विमानसेवेचा लाभ घेत येणाऱ्या प्रवाशांसाठी करण्यात आलेल्या सुविधांचीही माहिती दिली.

संसर्गाचे प्रमाण कमी

सुरूवातीला झालेल्या संशोधनात ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग जास्त असल्याचे दिसून आले. आता मात्र, या व्हेरियंटच्या संक्रमणाचे प्रमाण जास्त असले तरी त्याच्या संसर्गाचे प्रमाण काहीसे कमी असल्याचे दिसून येत असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी दिली.

महापालिकेची सज्जता

  • साडेचारशे बेड तयार

  • ११०० ऑक्सिजन सिलिंडर सज्ज

  • आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणार

  • पुरेसा औषधसाठा उपलब्ध

"विदेशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांनी मनपाला त्वरीत माहिती द्यावी. कुणी माहिती लपवित असल्याचे आढळल्यास नागरिकांनी त्यांची माहिती मनपास द्यावी. सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येकाने सहकार्य करावे."

-दयाशंकर तिवारी, महापौर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earthquake in Delhi: तब्बल १० सेकंद राजधानी हालली...दिल्ली, नोएडा, गाझियाबादमध्ये भूकंपाचे मोठे धक्के

Indian Womens Hockey: अनुभवी हॉकी खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे घसरण : हरेंद्र सिंग

Horoscope Prediction Guru Purnima 2025: गुरु पौर्णिमेला गजकेसरी अन् मालव्य राजयोग, मिथुनसह या राशींना धनलाभ आणि सुखाची प्राप्ती!

Stock Market Opening: सेन्सेक्सची 122 अंकांच्या वाढीसह सुरुवात; मेटल क्षेत्रात तेजी, कोणते शेअर्स घसरले?

Latest Maharashtra News Updates : आलमट्टी उंचीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार, महाराष्ट्राचे शिष्टमंडळ भेटणार जलमंत्र्यांना

SCROLL FOR NEXT