RTMNU 
नागपूर

नागपूर विद्यापीठ परिसरात पाणीसंकट! टंचाई दूर करण्यासाठी हवे फुटाळा तलावातील पाणी 

मंगेश गोमासे

नागपूर ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील परिसरात (कॅम्पस) पाण्याची मोठी समस्या आहे. कॅम्पसमध्ये मनपाकडून पिण्याचे पाणीपुरवठा होत आहे. मात्र, अन्य वापरासाठी अभियांत्रिकी विभागाला जुगाड करावा लागतो. पाण्याची ही टंचाई दूर करण्यासाठी नागपूर विद्यापीठ प्रशासनाला शहरातील फुटाळा तलावातून पाणीपुरवठा हवा आहे. मात्र, त्याबाबत काहीच होत नसल्याने उन्हाळा सुरू होताच विद्यापीठाचे पाणी संकट वाढले आहे.

अमरावती मार्गावरील विद्यापीठ परिसर आणि ‘एलआयटी’ परिसर दोन्ही उंच भागावर आहे. त्यामुळे येथे पाणीपुरवठा करणे हे कसरतीचेच काम आहे. कॅम्पसमध्ये पाण्याच्या समस्येमुळेच परिसरात एकही उद्यान नाही. दुसरीकडे अभियांत्रिकी विभागाला अनेक प्रकारचे जुगाड करून विविध विभागांमध्ये पाणीपुरवठा करावा लागतो. 

कॅम्पसमध्ये झाडांच्या देखरेखीसाठी पाण्याचेही टँकर मागवावे लागते. नागपूर विद्यापीठाला सध्या अंबाझरी तलावातून पाणीपुरवठा होत आहे. विद्यापीठ प्रशासनाला फुटाळा तलावातून पाणीपुरवठा हवा आहे. यासाठी तलाव ते कॅम्पसपर्यंत पाइपलाइन टाकावी लागणार आहे. सोबतच यासाठी पंप आणि अन्य उपकरणेही बसवावी लागतील. या संपूर्ण प्रकल्पात विद्यापीठाला सुमारे २५ लाखांवर खर्च येणार होता. 

हा प्रकल्प यशस्वी झाल्यास कॅम्पस आणि एलआयटी परिसरातील पाणीटंचाई दूर होणार होती. याशिवाय गोरेवाडा येथून होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा वाडी येथील टाकीतून व्हावे यासाठीही विद्यापीठ प्रशासनाकडून अनेक वर्षांपासून प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, अद्याप या दिशेने विद्यापीठाने कुठलेही पाऊल उचललेले नाही. त्यामुळे विद्यापीठ परिसराला पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागतो आहे.

ग्रीन ऑडिटमध्येही सूचना

विद्यापीठ परिसरात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत असते. वर्षभरापूर्वी विद्यापीठाद्वारे ग्रीन ऑडिट करण्यात आले. ते करताना या समस्येकडेही विद्यापीठाच्या समितीने लक्ष वेधले. त्यात परिसरात पाण्याची समस्या असल्याने ते जतन करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.

पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे

विद्यापीठाने दोन वर्षांपूर्वी याबाबत तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी सकारात्मकता दर्शविली होती. मात्र, प्रत्यक्षात कुठलीच कारवाई केल्याचे आढळून आले नाही. मात्र, आता पालकमंत्र्यांनी त्याची दखल घेत विद्यापीठाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT