Mohan Bhagvat_RSS
Mohan Bhagvat_RSS 
नागपूर

"देशातील विविधतेला आम्ही फुटिरतावाद मानत नाही"; प्रजासत्ताक दिनी मोहन भागवतांचं विधान

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशभरात आज ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. यानिमित्त नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातही राष्ट्रध्वज फडकावून त्याला वंदन करण्यात आलं. संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. यावेळी संबोधित करताना देशातील विविधतेचा गौरव करताना या विविधतेला आम्ही फुटिरतावाद मानत नाही, असं म्हटलं. तसेच यासाठी सर्वांमधील बंधुभाव महत्वाचा असल्याचं अधोरिखित केलं. (We do not consider diversity in country as separatism says Mohan Bhagwat on 75 Republic Day at RSS headquarter)

भागवत म्हणाले, संविधान अनुरूप आपलं आचरण असले पाहिजे. स्वातंत्र्यता येण्यासाठी समतेचा संकोच असतो दोन्ही सोबत येऊ शकत नसतं. पण यासाठी बंधुता पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे हे आम्ही बनवलेली व्यवस्था आहे. असा एक आत्मियतेचा भाव असतो हाच भाव आपसांत बंधुभावाच्या रुपानं प्रकट होतो. हा बंधुभाव आपण जपला पाहिजे.

भारतीयांची ताकद अपरंपार आहे, ती कधीही कमी झाली नव्हती, ती तशीच कायम आहे. पण भारतीयांची ही ताकद जेव्हा जागृत होते तेव्हा तो अनेक चमत्कार जगात करतो जो आज करत आहे. असा भारतवर्ष असेल असं जर ४० वर्षांपूर्वी आपण म्हटलं असतं तर आपल्याच लोकांनी आपली खिल्ली उडवली असती. आज आपण पाहतो की, प्रत्येक क्षेत्रात आपण पुढे जात आहोत. ही शक्ती कुठून आली? (Latest Marathi News)

ही शक्ती आपल्यात कायम होती. पण ती परिणामकारक तेव्हा होते जेव्हा आपण बंधुभावाच्या सामुहिक भावनेनं गुंतलेलो असतो. हे केवळ माझ्यासाठी नाहीतर सर्वांसाठी आहे. कारण सर्वजण माझे आहेत. दिसतात वेगळे पण आपल्या देशाची परंपरा आहे की सर्व विविधतेचा स्विकार करायची. आपण विविधतेला फुटिरतावाद मानत नाही. (Latest Marathi News)

याप्रकारे बंधुभावानं देशासाठी सर्वांनी मिळून काम केलं, संविधानाच्या अनुशासनाचं पालन करतील, त्याच्या पवित्रतेवर टाच येऊ देणार नाही, त्याचा भाव लक्षात घेऊन त्याचा योग्य वापर करु तेव्हाच देश उत्कर्षाच्या दिशेनं जाईल, यासाठी समर्पणाचा भाव पाहिजे, असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाच्या चौकशीसाठी बाल हक्क मंडळाची पोलिसांना परवानगी, बाप अन् आजोबांचे असहकार्य

First ST Bus : आजच्याच दिवशी धावली होती पहिली 'लालपरी'; कशी, कुठे...काय आहे इतिहास?

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 1 जून 2024

Latest Marathi News Live Update: शेटवच्या टप्प्यातील मतदानाला थोड्याच वेळात सुरूवात

Lok Sabha Election 2024: AIच्या माध्यमातून भाजपाविरोधी अजेंडा राबवण्याचा झाला प्रयत्न! Open AI चा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT