Summer Season
Summer Season esakal
नागपूर

Weather update : सलग तिसऱ्या दिवशी पाऱ्याने उसळी घेतली ; पारा ४१ अंशांवर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विदर्भात उन्हाचे चटके दिवसेंदिवस वाढत असून, सलग तिसऱ्या दिवशी पाऱ्याने उसळी घेतली आहे. गेल्या तीन दिवसांत नागपूरच्या कमाल तापमानात दहा अंशांची वाढ होऊन, पाऱ्याने यंदाच्या मोसमातील उच्चांक गाठला. बुधवारपासून पावसाची शक्यता असल्याने नागपूरकरांना ऊन व उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

विदर्भात मंगळवारीही अपेक्षेप्रमाणे सूर्यनारायणाचा प्रकोप पाहायला मिळाला. बुलढाण्याचा अपवाद वगळता विदर्भातील सर्वच जिल्ह्यांच्या तापमानात लक्षणीय वाढ झाली. शनिवारी ३१.२ अंशांवर असलेला पारा तीन दिवसांत तब्बल १० अंशांनी चढून ४१.२ अंशांवर पोहोचला. यंदाच्या मोसमातील नागपूर हे सर्वाधिक तापमान होते.

विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद चटके वाढले; पारा ४१ अंशावर चंद्रपूर येथे ४३.६ अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली. याशिवाय ब्रम्हपुरी (४३.२), गोंदिया (४३.२), वर्धा (४३.०) आणि यवतमाळ (४३.०) येथेही उन्हाचा तडाखा जाणवला. उन्ह व उकाड्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त आहेत.

आजपासून वादळी पाऊस?

विदर्भात सध्या उन्हाची लाट असली तरी, `वेस्टर्न डिस्टर्बन्स''मुळे बुधवारपासून वातावरण बदलण्याची शक्यता आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दोन-तीन दिवस पाऊस व ढगाळ वातावरण राहणार आहे. या काळात नागपूरसह काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाने दारू प्यायलेला पब करण्यात आला सील; मालकासह मॅनेजरला ४ दिवसांची कोठडी

Copa America 2024: मेस्सी करणार अर्जेंटिनाचे नेतृत्व, कोपा अमेरिका स्पर्धेसाठी संघाची घोषणा

Prashant Kishor: लोकसभा निवडणुकीत भाजप विजयी होणार? मोदींच्या हॅट्रिकबद्दल प्रशांत किशोर यांची मोठं भाकित

SBI Chairman Interview: SBI चेअरमन पदाची मुलाखत अचानक रद्द, काय आहे प्रकरण?

Singapore Airlines: लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू, तर अनेक जण जखमी

SCROLL FOR NEXT