weather update nagpur Monsoon arrives in Vidarbha first week of June google
नागपूर

आनंदाची वार्ता : जूनच्या पहिल्या आठवड्यात विदर्भात मॉन्सूनचे आगमन?

जूनच्या पहिल्या आठवड्यात विदर्भात मॉन्सूनची एंट्री होण्याची दाट शक्यता; तसा अंदाज प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला

नरेंद्र चोरे

नागपूर : दक्षिण-पश्चिम मॉन्सून यंदा अपेक्षेपेक्षा लवकर अंदमानमध्ये दाखल झाल्याने विदर्भात केव्हा आगमन होईल, याबद्दल शेतकऱ्यांमध्ये सध्या उत्सुकता आहे. मॉन्सूनचा प्रवास अडथळ्याविना योग्य दिशेने कायम राहिल्यास जूनच्या पहिल्या आठवड्यात विदर्भात मॉन्सूनची एंट्री होण्याची दाट शक्यता आहे. तसा अंदाज प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरातील मॉन्सून आज सोमवारी अंदमानमध्ये पोहोचल्याचे भारतीय हवामान विभागातर्फे जाहीर करण्यात आले. दरवर्षीच्या तुलनेत यंदा सहा दिवस लवकर मॉन्सून आल्याने इतरही ठिकाणी लवकर आगमन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. साधारणतः अंदमानमध्ये २२ मेच्या आसपास मॉन्सूनचे आगमन होते.

यावर्षी मॉन्सूनने निर्धारित वेळेपूर्वीच मुहूर्त साधला. विदर्भातील मॉन्सूनच्या संभाव्य आगमनाबद्दल हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांना विचारणा केली असता ते म्हणाले, हा पहिल्या टप्प्यातील मॉन्सून असून, तो पुढे आसाम, मेघालयमार्गे पूर्वोत्तर दिशेने सरकण्याची शक्यता आहे. लवकरच दुसऱ्या टप्प्यातील मॉन्सूनचे आगमन अपेक्षित आहे. अरबी समुद्रमार्गे येणारा हा मॉन्सून २७ च्या आसपास केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे.

ते पुढे म्हणाले, विदर्भात मॉन्सून नेमका किती तारखेला येणार आहे, हे आतापासूनच सांगणे कठीण आहे. मात्र मॉन्सूनचा प्रवास योग्य दिशेने सुरू राहिल्यास यंदा अपेक्षेपेक्षा लवकर येण्याची शक्यता आहे. याउलट मॉन्सूनच्या मार्गात अडथळे आल्यास, आगमनाला उशीरही होऊ शकतो. एकूणच मॉन्सूनचे गणित प्रवास आणि मार्गात येणाऱ्या अडथळ्यांवर अवलंबून असते.

साधारणपणे विदर्भात मॉन्सूनचे आगमन १० जूनच्या आसपास होते. यावर्षी लवकर आगमन झाल्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात विदर्भात मॉन्सूनच्या आगमनाची शक्यता दिसते. तथापि, यासंदर्भात आठ दिवसांपूर्वीच ठामपणे सांगता येणार असल्याचे ते म्हणाले. भारतीय हवामान विभागाने यंदा सरासरीच्या ९९ टक्के पावसाचा यापूर्वीच अंदाज व्यक्त केलेला आहे. ही विदर्भासह देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

नागपूरचा पारा सहा अंशांनी घसरला

दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे बुधवारी विदर्भातील उन्हाची लाट अचानक ओसरली. यवतमाळचा अपवाद वगळता विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतील कमाल तापमानात मोठी घसरण झाली. उन्हापासून सर्वाधिक दिलासा चंद्रपूर व नागपूरकरांना मिळाला. चोवीस तासांत नागपूरच्या तापमानात ५.७ अंशांची घट होऊन पारा ४० अंशांच्या खाली ३९.४ वर आला. रविवारी नागपूरचे कमाल तापमान ४५.१ अंशांवर गेले होते. चंद्रपूरचेही तापमान ४६.८ अंशांवरून ३९.८ अंशांवर आले. याउलट स्थिती यवतमाळमध्ये होती. येथे विदर्भात सर्वाधिक ४५.५ अंशांची नोंद करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Giorgia Meloni wish PM Modi: मोदींना इटलीच्या पंतप्रधान मेलोनींकडून 'सेल्फी'वाल्या मेसेजद्वारे खास शुभेच्छा, म्हणाल्या...

Jalgaon News : जळगाव विमानसेवा ठप्प: अहमदाबाद विमान दीड महिन्यापासून बंद, प्रवाशांची गैरसोय!

Latest Marathi News Updates : हिमाचल आपत्तीवर भाजप खासदार कंगना राणौत यांचे विधान

Facial Surgery Success Story: "सुसाईड डिसीज"वर यशस्वी शस्त्रक्रिया - ठाण्यात दोन रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

Manoj Jarange Patil: चलो दिल्ली! मराठे दिल्लीत धडकणार, देशभरातील मराठ्यांना मनोज जरांगे करणार एकत्र

SCROLL FOR NEXT