Nagpur University will gift payment Gateway for students Nagpur Latest News  
नागपूर

Welcome 2021: नव्या वर्षात विद्यार्थ्यांना ऑनलाइन पेमेंटची भेट; नागपूर विद्यापीठाकडून सुरू होणार ‘पेमेंट गेटवे’ 

मंगेश गोमासे

नागपूर ः गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे करण्यात आलेला ऑनलाइन पेमेंटचा संकल्प येणाऱ्या नव्या वर्षात पूर्ण होणार आहे. विद्यापीठाद्वारे सर्व प्रकारच्या शुल्काचा भरणा करण्याच्या उद्देशाने नव्या वर्षात ‘पेमेंट गेटवे’च्या माध्यमातून सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग लॉ कॉलेज, बी.एड. कॉलेज, एमबीए विभाग लॉ चौक, एलआयटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा रामदासपेठ अशा विविध भागांमध्ये विभागले आहेत. मात्र, सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी अमरावती मार्गावरील कॅम्पस येथेच सोय आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व प्रकारचे शुल्क हे ऑनलाइन पद्धतीने स्वीकारावे असे आदेश दिले होते. 

विद्यापीठाने आयटी रिफार्मच्या दिशेने पाऊल टाकले असले तरी अद्यापही ‘गेटवे पेमेंट’ सुरू न केल्याने विद्यार्थ्यांना समस्येचा सामना करावा लागत होता. बीए, बी.कॉम, बीएससीसारख्या अभ्यासक्रमात विविध शुल्क असल्याने त्याचे शुल्क कसे भरावे हा प्रश्‍न होता. मात्र, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत ‘ऑनलाइन पेमेंट’ योग्यरीत्या झाल्याने विद्यापीठाने ही प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे ठरविले. 

ऑफलाइन पेमेंटचीही सुविधा 

विद्यापीठाद्वारे "पेमेंट गेटवे'च्या माध्यमातून ऑनलाइन शुल्क भरण्याची सुविधा देण्यात आली तरी, यासोबत कुठलाही घोळ होऊ नये यासाठी ‘ऑफलाइन पेमेंट’ ची सुविधाही कायम ठेवण्यात येईल. ग्रामीण भागातील महाविद्यालये अद्यापही ‘डिमांड ड्राफ्ट’ (डीडी) रूपाने परीक्षा शुल्क भरत असल्याने त्यांच्यासाठी ही सोय कायम ठेवण्यात येईल.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT