file photo 
नागपूर

कार्यकारी प्राचार्यासाठी कोणती अट केली रद्द.....वाचा सविस्तर

मंगेश गोमासे

नागपूर : महाविद्यालयातील प्राचार्य निवृत्त झाल्यावर, त्याजागी नव्याने प्राचार्याची निवड करणे बरेच क्लिष्ट प्रक्रिया असते. त्यामुळे जोपर्यंत हे पद भरल्या जात नाही, तोपर्यंत त्या जागेवर कार्यकारी प्राचार्यांची निवड करावी लागते. ही निवड करताना नियमानुसार यापूर्वी ज्येष्ठ प्राध्यापकाची निवड केल्या जात होती. मात्र, आता सरकारने या नियमात बदल करून १५ वर्षाचा प्राध्यापक म्हणून अनुभव असलेल्या प्राध्यापकाला नेमता येईल असा आदेश दिला आहे.

एखाद्या महाविद्यालयात कार्यकारी प्राचार्य नेमण्यासाठी सेवाज्येष्ठता आवश्यक करण्यात आली होती. मात्र या व्यक्तीने पद नाकारल्यास त्यापेक्षा कमी सेवाज्येष्ठता असलेल्या व्यक्तीला कार्यकारी प्राचार्य पद देण्यात येते. मात्र बहुतांशी या पदावर एखाद्याची नेमणूक करणे नेहमीच डोकेदुखी ठरत असते. अनेकदा नेमण्यात आलेले ज्येष्ठ प्राध्यापक संस्थेचे ऐकत नसल्याने वाद निर्माण होतात. त्यामुळे नेमण्यात आलेला कार्यकारी प्राचार्य संस्थेच्या मतातील असावा यासाठी बरेच संस्थाचालक प्रयत्नरत असतात.
विळखा वाढतोय... पंधरा दिवसात १० शिक्षकांचा मृत्यू, आता संघटनांनी दिला हा इशारा

मात्र, तसे न झाल्यास हा वाद विद्यापीठ आणि प्रसंगी न्यायालयातही जातो. त्यामुळे संस्थेचे मोठे नुकसान होते. शिवाय ज्येष्ठ प्राध्यापकाची निवड केल्यावर तो काही दिवसातच सेवानिवृत्त झा२५० ल्यास पुन्हा नव्याने प्रक्रिया करावी लागते. विशेष म्हणजे ही निवड करताना विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठवावा लागतो. विद्यापीठाकडून मान्यता मिळल्यावरच कार्यकारी प्राचार्यांची निवड होते. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी राज्याद्वारे आदेश काढून कार्यकारी प्राचार्य निवडताना केवळ १५ वर्षाचा प्राध्यापक पदाचा अनुभव ग्राह्य धरण्यात आला आहे. यामुळे शैक्षणिक संस्थाना मोठा दिलासा मिळाला आहे.


ज्येष्ठ प्राध्यापकांमध्ये रोष
सरकारकडून काढण्यात आलेल्या आदेशामुळे जेष्ठ प्राध्यापकांना डावलणारा आदेश असल्याची टीका करण्यात आलेली आहे. या प्रकाराने त्यांच्या सेवेत लागणारे कार्यकारी प्राचार्याची सेवा मिळणार नसल्याने त्यांचेही नुकसान होणार आहे त्यामुळे या प्राध्यापकांवर अन्याय होणार असल्याने त्याच्यात रोष निर्माण झाला आहे.

२५० महाविद्यालयात प्राचार्यांची पदे रिक्त
महाविद्यालयांच्या दृष्टीकोनातून प्राचार्यांची पदे भरणे गरजेचे असताना विद्यापीठाशी संलग्नित २५० महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांचा पदे रिक्त आहेत. गेल्या काही वर्षात विद्यापाठाद्वारे या महाविद्यालयांना प्राचार्य पद भरण्यासाठी अनेकदा पत्र पाठविण्यात आलीत. मात्र, अद्यापही या महाविद्यालयांकडून त्याबाबत कारवाई करण्यात आलेली नाही.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT