What did Mayor Joshi say to Commissioner Mundhe? 
नागपूर

आयुक्त मुंढेंना काय म्हणाले महापौर जोशी ? वाचा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अपमान झाल्याने सभागृहात येणारच नाही, ही भूमिका शहर विकासाला बाधक आहे. राग सोडून मंगळवारी होणाऱ्या सभेत परत यावे, ही सभागृहाची भावना आहे. मनाचा मोठेपणा दाखवून सभागृहात उपस्थित राहावे, अशी विनंती करणारे पत्र महापौर संदीप जोशी यांनी आज आयुक्त तुकाराम मुंढे यांना पाठविले. काल महापौरांनी दूरध्वनीवरून समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अपयशी ठरल्याने आज महापौरांनी सविस्तर पत्र लिहून आयुक्तांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. 

शनिवारी महापालिकेच्या सभागृहात घटनेची पायमल्ली करणारी घटना घडली. या घटनेचा उल्लेख करीत महापौर संदीप जोशी यांनी आज आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र पाठविले. कालच्या घटनेवर दुःख व्यक्त करीत महापौरांनी सभागृहानेही याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे आयुक्तांना सांगितले. याशिवाय सभागृहात घडलेल्या नाट्यासाठी कारणीभूत ठरलेल्या "पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन'च्या नियमाबाबत महापौरांनी आयुक्तांना स्पष्ट केले. मात्र, हरीश ग्वालवंशी यांनी जे काही वक्तव्य केले, त्याचे कुणीही समर्थन करीत नाही. 

मात्र, ते वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याचे संवैधानिक अस्त्र असताना सभागृहाचा त्याग करणे आयुक्तपद, सभागृह आणि लोकशाहीची गरिमा कलंकित करणारे आहे, अशी समजूतही महापौरांनी पत्रातून काढली आहे. सभागृहात परत यावे, यासाठी अतिरिक्त आयुक्तांसह मीही फोन केला. परंतु, अपमान झाल्याने सभागृहात येणारच नाही, ही भूमिका शहर विकासाच्या दृष्टीने हानिकारक आहे, असेही महापौरांनी पत्रात म्हटले आहे. 

कोरोनाच्या काळात शहराला आयुक्त मुंढेंची गरज असल्याचे महापौरांनी पत्रात नमूद केले आहे. लोकप्रतिनिधींसोबत संवाद ठेवून कधी त्यांचेही ऐकून घ्यावे, असे आवाहन महापौरांनी त्यांना केले. सिवेज लाइनवरील चेंबर तुटली, पावसाच्या पाण्यासह घाणपाणी नागरिकांच्या घरांत शिरत आहे. पावसाळी नाल्या तुंबल्या आहेत. त्यामुळे शहरातील जनता नगरसेवकांच्या घरी जाऊन ओरडत आहे, अशी नगरसेवकांची स्थिती मांडत महापौरांनी 6 जूनला आवश्‍यक कामे तत्काळ सुरू करण्याबाबतच्या दिलेल्या आश्‍वासनाचीही आयुक्तांना आठवण करून दिली. ही कामे तत्काळ सुरू करण्याची विनंतीही आयुक्तांना केली. 

समर्थकांच्या घोषणाबाजीकडेही वेधले लक्ष 
काल, शनिवारी सभागृहाबाहेर आयुक्तांचे फोटो असलेले बॅनर घेऊन त्यांच्या समर्थनात काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. याकडे पत्रातून लक्ष वेधत ही घोषणाबाजी करणाऱ्यांची समजूत काढण्याची गरज होती. घोषणाबाजी थांबविली असती तर नागपूरकरांनी आपला मोठेपणा अनुभवला असता, असा टोलाही महापौरांनी आयुक्तांना लगावला. मनपा कायद्यानुसार सभागृह हे सार्वभौम आहे. सभागृहातून आयुक्तांनी निघून जाणे हा सभागृहाचा अपमान आहे, असे महापौरांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: राम मंदिर परिसरात दुर्घटना! सार्वजनिक शौचालयात केमिकल गळती; उग्र वासाने गुदमरून दोघांचा मृत्यू

Viral Video: रील्समध्ये दाखवले घरातील सोनं अन् रोकड; चोरट्यांनी घर फोडून लुटलं तब्बल 1 कोटींचं धन

Athani Crime Case: अनैतिक संबंधासाठी त्रास दिल्याने तरुणाचा खून, मित्राच्या मदतीने महिलेचे कृत्य; अथणीतील घटना

Maharashtra Drought: दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढणार, लोकप्रतिनिधींकडून आणखी तालुक्यांचा समावेशाच्या मागणीची शक्यता

Vaijapur Student Assault Case: गणिताचे कोडे न सुटल्याने चौथीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT