What parents are doing for the eleventh admission 
नागपूर

अकरावी प्रवेशासाठी काय करताहेत पालक !

मंगेश गोमासे

नागपूर : राज्य शिक्षण मंडळाद्वारे अकरावीच्या प्रवेशासाठी प्रक्रिया जाहीर करताच आता पालकांमध्ये पाल्याला नामवंत महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी दहावीच्या निकालापूर्वीच पालकांनी नामवंत महाविद्यालयात प्रवेशाची बुकींग सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनामुळे यंदा दहावीच्या एका विषयाचा पेपर रद्द करण्यात आला. याशिवाय टाळेबंदीमुळे पेपर तपासणीच्या कामात बराच उशिर झाल्याने निकाल नेमका केव्हा लागेल याबाबत मंडळाकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, शालेय शिक्षण विभागाने एक जुलैपासून अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. 15 जुलैपासून राज्यातील पाच शहरांमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जाची नोंदणी सुरू करण्यात येईल. दरवर्षी अकरावीमध्ये शहरातील नामवंत कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पाल्याचा प्रवेश मिळवून घेण्यासाठी पालक प्रयत्न करीत असतात.

यासाठी अनेकदा नेतेमंडळी आणि महाविद्यालयातील संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना गळ घालताना दिसून येतात. यावर्षी कोरोनामुळे निकालास उशिर होत असल्याने प्रक्रियाही उशिरा सुरू होणार आहे. मात्र, यानंतरही पालक प्रवेशासाठी सक्रीय झाले आहेत. विशेष म्हणजे द्विलक्षी अभ्यासक्रमात असलेल्या इलेक्‍ट्रानिक्‍स आणि फिशरीज विषयांमध्ये प्रवेशाकडे पालकांचा कल असतो. दरवर्षी यासाठी पालकांमध्ये प्रवेशासाठी चढाओढ असते. त्यामुळे अगोदरच प्रवेशाची बुकींग झाल्यास प्रवेशाबाबत धावपळ होत नाही. त्यामुळे पालकांनी प्रवेशापूर्वीच बुकींग करण्यास सुरुवात केली आहे.
 
कोट्यातून प्रवेश
कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेशामध्ये वीस टक्के कोटा असतो. केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेत अकरावीमध्ये अगोदर कोट्यातील प्रवेशाबाबत माहिती देणे आवश्‍यक असते. त्यामुळे याच कोट्यातून पालकांकडून प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न केल्या जातो. मात्र, द्विलक्षी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी गर्दी होत असल्याने पालकांना त्यासाठी अधिकची रक्कम मोजावी लागते.

इन्फोबॉक्‍स
एकूण जागा -58,840
केंद्रीय समितीमार्फत प्रवेश - 30,009
आरक्षित जागांचे प्रवेश - 7,529
एकूण प्रवेश - 37,558
रिक्त जागा - 21,282
प्रवेशाची टक्केवारी - 51.04

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT