What is the sanctity of parents for the eleventh admission? .... Read more 
नागपूर

अकरावी प्रवेशासाठी काय आहे पालकांचा पवित्रा ?.... वाचा सविस्तर

मंगेश गोमासे

नागपूर  : महाविद्यालयात एकेकाळी नियमित क्‍लास व्हावेत, यासाठी पालक आग्रही असत. काळाच्या ओघात "क्‍लास'ची जागा आता भरगच्च क्‍लासेसनी घेतली. क्‍लासेसमध्ये जाण्यासाठी विद्यार्थी महाविद्यालयातील "क्‍लास' बुडवायला लागले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्यातरी नियमित वर्ग घेता येणे शक्य नसले तरीही नियमित वर्ग होणारे कॉलेज नकोच अशाच भूमिकेत पालक असल्याचे दिसत आहे.

दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशाची प्रक्रिया आता सुरू झाली. चांगल्या महाविद्यालयात प्रवेशासाठी पालकांची चढाओढ सुरू झालेली असताना नियमित अभ्यासक्रम शिकविणाऱ्या महाविद्यालयांकडे खुद्द पालकांनीच पाठ फिरविल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. क्‍लासेसशिवाय विद्यार्थ्यांची प्रगती नाही, असा विचार मनात ठेवून गेल्या दोन वर्षांत पालकांनीच नियमित "क्‍लास' बंद पाडून क्‍लासेसचे वर्ग "फुल्ल' करण्याचा पवित्रा अवलंबिला.

याची प्रचिती बड्या महाविद्यालयांत होणाऱ्या प्रवेशानंतर दिसून येते. शहरातील एका बड्या महाविद्यालयात तर पालकांनीच नियमित वर्ग न घेण्याचे विनंतीपत्र पाठविले असल्याचे समजते. त्यामुळे अशा महाविद्यालयातील प्राचार्यांची चिंता वाढली आहे. विज्ञान व वाणिज्य शाखेत अशी उदाहरणे नित्याचीच बाब आहे. विशेष म्हणजे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांनी क्‍लासेसच्या माध्यमातून ग्रामीण भागात प्रवेश घेतल्याचे निदर्शनास येते.


नुकसान विद्यार्थ्यांचेच
महाविद्यालयात नियमित क्‍लासमध्ये शिकविण्यात येणाऱ्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना विषयाव्यतरिक्त इतरही ज्ञान मिळत असते. याशिवाय अनुभवी प्राध्यापकांचे अनुभव त्यांच्या कामात येतात. मात्र, क्‍लासेसमध्ये केवळ विषयांवर चर्चा होऊन त्यानुषंगाने हवे ते व्यावहारिक ज्ञान मिळत नाही. त्यामुळे परीक्षांमध्ये ज्ञानाचा फायदा होत असला, तरी वास्तविक जीवनात त्याचा उपयोग होत नाही.


प्राचार्य हतबल
महाविद्यालयांमध्ये नियमित क्‍लास घेण्याची कितीही इच्छा असली, तरी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात प्राचार्य हतबल झालेले आहेत. महाविद्यालयात प्राध्यापकांना शिकविण्याचे कामच उरले नाही. अशा परिस्थितीत काय करावे, असा प्रश्‍न प्राचार्यांना पडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT