नागपूर : नवनियुक्त कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी. 
नागपूर

नागपूर विद्यापीठाच्या नवनियुक्त कुलगुरूचे व्हिजन आहे तरी काय ?.... वाचा सविस्तर

मंगेश गोमासे

नागपूर ः  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा दर्जा आणि रँकिंग सुधारण्यासाठी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेटवर्क उभारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल. रोजगार तसेच कौशल्यावर आधारित विविध उपक्रम सुरू करण्यचा मानस नवनियुक्त कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांनी ‘सकाळ'शी बोलताना व्यक्त केला.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शनिवारी नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुभाष चौधरी यांची निवड केली. यानंतर बोलताना ते म्हणाले, विद्यापीठाचा दर्जा आणि रँकिंग सुधारण्यासाठी सर्वांवाचे प्रयत्न आणि सहकार्याची गरज आहे. त्यासाठी विद्यापीठात डिजिटलायझेशन करण्यावर भर दिला जाईल.

विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी प्राध्यापकांचे अभ्यासक्रमाचे व्हिडिओ तयार करून ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. विशेष म्हणजे विद्यापीठात नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यावर भर देणार आहे. विद्यार्थ्यांना अधिकाअधिक रोजगारक्षम करण्यासाठी अभ्यासक्रमनिर्मिती आणि कौशल्य विकासावर आधारित विविध उपक्रम सुरू करण्यात येईल.

अभियांत्रिकी शाखेचे पद्‍वीधर असलेले डॉ. चौधरी यांनी व्यावसायिक महाविद्यालय आणि उद्योग यांच्यात संवाद घडवून आणत संयुक्तपणे काम करण्यावर भर देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. गेल्या अनेक वर्षांत अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम बदलला नसल्याने अनुदान आयोगाने नियमित केलेला अभ्यासक्रम लागू करणार असल्याचे त्यांना स्पष्ट केले.

सरकारच्या परवानगीनंतरच पदभरती
विद्यापीठात रिक्त पदांची संख्या मोठी आहे. त्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे. प्राध्यापकांची व कर्मचाऱ्यांची पदे भरण्यासाठी सरकारने परवानगी दिल्याशिवाय भरता येणार नाही. मात्र, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेटवर्क उभारल्यावर त्याची फारशी गरज भासणार नाही. त्यामुळे आहे त्या मनुष्यबळात काम करीत त्यानुसार विद्यापीठाच्या प्रगतीवर भर देण्यात येणे शक्य होईल असेही चौधरी यांनी सांगितले.

संपादन - मंगेश गोमासे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच म्हणाले...

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT