What warning did Commissioner Munde give to the traders? 
नागपूर

आयुक्त मुंढेंनी व्यापाऱ्यांना दिला कोणता इशारा? वाचा सविस्तर

राजेश प्रायकर

नागपूर : राज्यातील सर्व महापालिका हद्दीतील व्यावसायिकांनी महाराष्ट्र महापालिका कायद्यानुसार महापालिकेत नोंद करीत परवाना घेतला. नागपुरातही या कायद्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू केली. परंतु व्यापाऱ्यांनी विरोध सुरू केला. त्यामुळे आता परवाने घेण्यासाठी कालावधी निश्चित करण्यात येईल. या कालावधीत परवाना न घेतल्यास दुकाने सुरू ठेवता येणार नाही, ही धमकी नसून इशारा असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज स्पष्ट केले.

शहराच्या विकासासाठी नियमाची अंमलबजावणी करताना कुणी अडथळा आणेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी बजावले. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज कोरोनाचे वाढते रुग्ण, व्यापाऱ्यांकडून होत असलेला कोरोना चाचणी व परवाना घेण्यास विरोधावर ‘फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून स्पष्ट भूमिका मांडली. व्यवसायासाठी परवाना घेण्यास विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले.

संपूर्ण राज्यातील महापालिकांत व्यवसायाची नोंद करण्यात आली. परंतु नागपुरात नाही. या कायद्याची अंमलबजावणी सुरू केल्याने ‘लायसन्स राज'चा आरोप करीत विरोध केला जात आहे. मी नियमानुसार काम करीत आहे तर लायसन्स राज कसे?, व्यापारी निवासी इमारतीत व्यवसाय करीत आहे, त्यांची मनमानी चालेल काय? असा सवाल उपस्थित करीत त्यांनी व्यवसायाची नोंदणी होणारच, असे नमूद केले.

लोकांची दिशाभूल करणे टाळावे, व्यापाऱ्यांनी राजकारण करू नये, रीतसर नियमानुसार धंदा करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. आता काही व्यापारी संघटनांनी परवान्यासाठी अर्ज करू नये, असे आवाहन व्यापाऱ्यांना केले आहे. आत्तापर्यंत अर्ज करण्यासाठी कुठलाही निश्चित कालावधी नव्हता. परंतु आता व्यापाऱ्यांना परवान्यासाठी अर्ज करण्याकरिता कालावधी निश्चित करण्यात येईल. या कालावधीत अर्ज न केल्यास दुकानेच उघडू शकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. कोरोनाचे कारण पुढे करून नियम फेटाळून लावणे चालणार नाही, असेही त्यांनी बजावले.

कर्मचाऱ्यांची तपासणी करावीच लागेल
दुकानदार, कर्मचारी कोरोनाचे प्रसारक ठरू शकतात. कोरोनासंदर्भात मार्गदर्शक तत्त्व पाळायची नसेल तर दुकाने बंद करा, असेही आयुक्तांनी सुनावले. व्यापाऱ्यांमुळे शहर चालत नाही तर येथील तीस लाख लोकांमुळे शहर आहे. लोकांचे जीव वाचविण्यासाठी शासन निर्देशानुसार चाचणी करावीच लागेल, असे आयुक्त म्हणाले. नोकर ठेवण्यासाठी पैसे आहे, पण त्यांच्या चाचणीसाठी नाही, असे चालणार नाही, असेही ते म्हणाले. यासंदर्भात व्यापाऱ्यांसोबत चर्चाही झाली होती, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup Final: फुल राडा... अर्जेंटिनाचे खेळाडू हाणामारीवर उतरले, स्पेनच्या खेळाडूचा गळा दाबला, एकाला उचलून आपटले Video

Fifa World Cup Awards 2026 : लिओनेल मेस्सीला ना जेतेपद मिळाले, ना Golden Boot! वर्ल्ड कप पुरस्कारांमध्ये कोणी मारली बाजी, वाचा

FIFA WORLD CUP 2026 PRIZE MONEY: ४,८१,४०,००,०००! स्पेनने विजेतेपदाच्या ट्रॉफीसह जिंकली बक्कळ रक्कम; अर्जेंटिनाला किती बक्षीस मिळाले वाचा... जाणून घ्या वर्ल्ड कप विजेत्यांची यादी

Fifa World Cup Final : स्पेन विश्वविजेता! लिओनेल मेस्सीचा अर्जेंटिना 'चारीमुंड्या चीत'; १६ वर्षांनंतर 'Tiki-Taka' ची बाजी

Fifa World Cup Final : रेफरी झोपलाय का? अर्जेंटिनासाठी वर्ल्ड कप सेट केल्याचा आरोप... दोन घटना, ज्याने फुटबॉल विश्वात संताप, Video

SCROLL FOR NEXT