Whats App esakal
नागपूर

What's App Scam: तुमच्याच ‘व्हॉट्सअ‍ॅप’मधून तुमचीच फसवणूक! पिंक व्हॉट्सअ‍ॅपचा धोका, असा करा हॅकिंगपासून मोबाईलचा बचाव

प्रगत तंत्रज्ञानाचे जेवढे फायदे तेवढेच तोटेही आहेत. अलीकडे शहरात व्हॉट्सॲप आणि सिमकार्ड हॅकिंगचे प्रमाण वाढले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Whats App Fraud: प्रगत तंत्रज्ञानाचे जेवढे फायदे तेवढेच तोटेही आहेत. अलीकडे शहरात व्हॉट्सॲप आणि सिमकार्ड हॅकिंगचे प्रमाण वाढले आहे. त्यातून पैशांची मागणी करणारे संदेश व्हॉट्सअ‍ॅप कॉन्टॅक्ट्सना पाठवले जातात. या माध्यमातून, प्रकरणाची कल्पना नसणाऱ्या अनेकांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या घटना समोर येत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये सोशल नेटवर्क साइटच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये व्हॉट्सॲप आणि फेसबुक हॅक होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आपले ‘अकाऊंट सिक्युअर’ करून ठेवणे अत्यावश्‍यक झाले आहे. नागपूरकरांची यापुढे अशी फसवणूक होऊ नये, तसेच यावर आळा घालण्याच्या दृष्टीने फॉरेन्सिक सायन्सचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. आशिष बढिये यांनी काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्या सूचना अमलात आणल्यास नागरिकांना समाजमाध्यमातून होणारी फसवणूक टाळता येणे शक्य होईल.

असा करा हॅकिंगपासून स्वत:च्या मोबाईलचा बचाव

  • अनोळखी दूरध्वनी क्रमांकावरून आलेल्या कुठल्याच लिंकवर क्लिक करू नका.

  • तुमचे प्रोफाईल पेज सगळ्यांसाठी व्हिजिबल ठेवू नका. सेटिंगमध्ये जाऊन ओनली माय कॉन्टॅक्ट्स करा.

  • कुठलेही अॅप केवळ प्ले स्टोअर वरूनच डाउनलोड करा.

  • वैध परवानाधारक अँटिव्हायरस (व्हॅलिड लायसन्स असेलेले) वापरा.

  • सार्वजनिक उपकरणे आणि सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कवरून लॉग इन करू नका.

  • गूगलाचा वापर करून तुमचे पासवर्ड आणि इतर तपशील ‘डार्कवेब’वर लीक झाले आहेत का ते नियमितपणे तपासा.

  • सुरक्षितता प्रश्न आणि उत्तरे शक्य तेवढे कठीण ठेवावे.

  • एकाहून अधिक अॅप्सचा एकच पासवर्ड ठेवू नका.

  • पासवर्ड नियमितपणे बदला. त्यामध्ये नंबर्स आणि कॅरेक्टर्सचे संमिश्रण ठेवा. जेणेकरून तो सहज हॅक होणार नाही.

  • जिथे शक्य असेल तिथे टू फॅक्टर किंवा मल्टिफॅक्टर ऑथेंटिफिकेशन वापरा.

  • ‘डाउनलोड पिंक व्हॉट्सअॅप’ अशा स्वरूपाचे मॅसेजेच आल्यास त्यावर अजिबात क्लिक करू नका. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT